बाबूश, मिकीला मंत्रिपद अशक्य

By Admin | Updated: June 25, 2015 01:04 IST2015-06-25T01:04:48+5:302015-06-25T01:04:58+5:30

स्वत:ची व भाजपचीही प्रतिमा जपण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षता घेण्याचे व्यक्तीश: ठरविले आहे. यामुळेच आमदार मिकी पाशेको व बाबूश

Babush, Mikila ministers impossible | बाबूश, मिकीला मंत्रिपद अशक्य

बाबूश, मिकीला मंत्रिपद अशक्य

स्वत:ची व भाजपचीही प्रतिमा जपण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षता घेण्याचे व्यक्तीश: ठरविले आहे. यामुळेच आमदार मिकी पाशेको व बाबूश मोन्सेरात या दोघांनाही मंत्रिपद द्यायचे नाही, असे ठरले आहे. पाशेको तुरुंगातून सुटण्यापूर्वीच मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरावी व भाजप आमदाराला मंत्रिपद द्यावे, असाही निर्णय तत्त्वत: झाला आहे.
तुरुंगात जावे लागण्यापूर्वी आमदार मिकी पाशेको यांचे राजकीय वजन बऱ्यापैकी होते. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांसाठी तुरुंगाची शिक्षा झालेल्या पाशेको यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
त्यांचे नुवेतील व सासष्टीतील राजकीय वजनही घटले आहे. यामुळे पुन्हा त्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही. मिकी तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा मंत्रिपदावर दावा
करतील, याची मुख्यमंत्री पार्सेकर यांना
पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच पाशेको परतण्यापूर्वीच सध्याचे मंत्रिमंडळातील
रिक्त पद भरण्याचे ठरले आहे.
सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे भाजपमधील काही नेत्यांशी चांगले संबंध असले, तरी मोन्सेरात यांना मंत्रिपद मिळणार नाही. मार्च २०१७ पूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. केवळ २0 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. भाजपने चांगली प्रतिमा घेऊन निवडणुकीस सामोरे जावे म्हणून पार्सेकर आग्रही बनले आहेत. त्यामुळे भाजपमधीलच एखाद्या आमदारास मंत्रिपद द्यावे, असेही ठरले आहे.

Web Title: Babush, Mikila ministers impossible