पुण्यातील इसम गोव्यात मृतावस्थेत आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

By सूरज.नाईकपवार | Updated: November 30, 2023 10:37 IST2023-11-30T10:36:53+5:302023-11-30T10:37:05+5:30

१०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून विनय याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले होते

An Isam from Pune was found dead on the steps of a building in the city | पुण्यातील इसम गोव्यात मृतावस्थेत आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यातील इसम गोव्यात मृतावस्थेत आढळला, पोलिसांकडून तपास सुरू

सूरज नाईकपवार / मडगाव

मडगाव : मूळ महाराष्ट्रातील पुणे येथील शिवाजीनगर येथील एक इसम गोव्यातील मडगावात एका इमारतीच्या पायऱ्यावर मृतावस्थेत सापडला .त्याच्याकडील सापडलेल्या वाहतुक परवान्यावरुन मयताचे नाव विनय भिडे (४५) असे असून, तो पुणे येथील  असल्याची माहिती मिळाली. मयताकडे एक मोबाईलही सापडला. मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी वरील घटना घडली.

१०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून विनय याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मयताच्या कुटुंबियाकडे पोलिसांनी संपर्क साधून झालेली घटना कळविली. शवचिकित्सेनंतर मृतदेह मयताच्या कुटुंंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मडगाव पोलिसांनी वरील घटना पोलिस दफ्तरी नोंदवून घेतली आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: An Isam from Pune was found dead on the steps of a building in the city