गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 21:46 IST2019-06-24T21:09:44+5:302019-06-24T21:46:31+5:30

मसाज करण्यासाठी पीडीत  महिला  फातोर्डा येथील कदंब बसस्थानक नजिकच्या ऑर्चिड  वेलनेस अँड स्पा या मसाज पार्लरमध्ये गेली होती

american lady molested at goa in massage parlour | गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

गोव्यात मसाज पार्लरमध्ये अमेरिकन महिलेचा विनयभंग

मडगाव: मसाज पार्लरमध्ये एका अमेरिकन महिला नागरिकाचा विनयभंग झाल्याची घटना गोव्यात घडली आहे. राज्यातील दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथे एका मसाज पार्लरमध्ये ही घटना घडली. येथील ऑर्चिड  वेलनेस अँड स्पामध्ये मसाज करण्यासाठी सदर बेचाळीस वर्षीय पीडीत महिला गेली असता, ही घटना घडली. 22 जून रोजी ही घटना घडली. या प्रकरणी ङोहान शेख या संशयितावर गुन्हा नोंद केल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.


 मसाज करण्यासाठी पीडीत  महिला  फातोर्डा येथील कदंब बसस्थानक नजिकच्या ऑर्चिड  वेलनेस अँड स्पा या मसाज पार्लरमध्ये गेली असता तेथे विनयभंगाची ही घटना घडली.संशयितावर  भारतीय दंड संहितेच्या 354 कलमाखाली गुन्हा नोंद असून, सदया त्याचा शोध चालू असल्याची माहिती गावस यांनी दिली.  पीडीत महिला मसाजसाठी मसाज पार्लरमध्ये गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्लरमध्ये मसाजसाठी पुरुष व महिला उपलब्ध असतात. संशयिताने मसाज करताना वरील आगळीक केली.

मागाहून तिच्या पतीने यासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदविली. संशयित बोर्डा येथील रहिवाशी आहे. फातोर्डा पोलीस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहे.
 

Web Title: american lady molested at goa in massage parlour