प्रशासन अलर्ट; सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेवर भर; शिरगाव जत्रेसाठी तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:46 IST2026-04-12T08:45:50+5:302026-04-12T08:46:45+5:30

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घेतला आढावा, लईराई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू

administration alert focus on security transportation system Preparations speed up for shirgaon lairai fair | प्रशासन अलर्ट; सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेवर भर; शिरगाव जत्रेसाठी तयारीला वेग

प्रशासन अलर्ट; सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेवर भर; शिरगाव जत्रेसाठी तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील लईराई देवीची जत्रा २१ एप्रिलपासून सुरू होत असून हा उत्सव पाच दिवस चालणार आहे. जत्रेदरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी काल शनिवारी शिरगाव येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

यावेळी ते शिरगाव मंदिर या मार्गावरील रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दिशादर्शक फलक, रांगेची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि इतर सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

भाविकांसाठी स्वतंत्र रांगा, सुयोग्य दर्शन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. येत्या आठवड्यापासून अधिक काटेकोरपणे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती आमदार शेट यांनी दिली.

सुरक्षा व्यवस्थेवर भर

पोलिस, वाहतूक विभाग, जिल्हाधिकारी, देवस्थान समितीच्या समन्वयातून तयारी सुरू आहे. पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला जात आहे. ८४ सीसीटीव्ही वॉच ठेवणार

१८ रोजी होणार 'मॉक ड्रिल'

जत्रेदरम्यान भाविकांनी शिस्त पाळून आणि प्रशासनाला सहकार्य करून दर्शन घ्यावे, असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केले आहे. शिरगाव येथे अडचणीच्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करून त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले आहे. जत्रेच्या तयारीबाबत १८ एप्रिल रोजी सरकारी यंत्रणेतर्फे मॉक ड्रिल आयोजित केले आहे. यापुढे शिरगावात सतत पाठपुरावा करीत आढावा घेण्यात येणार असल्याचे आमदार शेट यांनी सांगितले.

जत्रा परिसरात सरात सुमारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून लाऊडस्पीकरद्वारे सतत सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच जत्रेच्या पहिल्या दिवशी मोक्याच्या ठिकाणी गावात दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही काही दिवसांपूर्वी भेट

देऊन आढावा घेतला असून सर्व तयारी आठ दिवस अगोदर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सर्व त्रुटी दूर करून भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जत्रेला भाविकांना प्रवेश असून सर्वांनी शिस्तीचे पालन करून देवदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title : प्रशासन अलर्ट: शिरगाँव जतरा के लिए सुरक्षा पर ध्यान केंद्रित

Web Summary : शिरगाँव की लईराई देवी जतरा 21 अप्रैल से शुरू। प्रशासन अलर्ट पर, सुरक्षा, यातायात और भक्तों की सुविधाओं पर ध्यान केंद्रित। विधायक शेटे ने सड़क मरम्मत और भीड़ प्रबंधन सहित तैयारियों की समीक्षा की। 18 अप्रैल को मॉक ड्रिल की योजना, सभी के लिए एक सहज, सुरक्षित त्योहार सुनिश्चित करना।

Web Title : Administration Alert: Focus on Security for Shirgaon Jatra

Web Summary : Shirgaon's Lairai Devi Jatra starts April 21st. Administration is on alert, focusing on security, traffic, and devotee facilities. MLA Shete reviewed preparations, including road repairs and crowd management. Mock drill planned for April 18th, ensuring a smooth, safe festival for all.