नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री दक्षिण गोव्यात दोघांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:10 IST2019-01-02T16:10:18+5:302019-01-02T16:10:32+5:30

दक्षिण गोव्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

Accidental death of two in South Goa on the first night of New Year | नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री दक्षिण गोव्यात दोघांचा अपघाती मृत्यू

नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री दक्षिण गोव्यात दोघांचा अपघाती मृत्यू

मडगाव: गोव्यातील नव्या वर्षाची सुरुवात कुठल्याही अपघाताविना झाली असली तरी या वर्षाची पहिली रात्र मात्र दोघाजणांसाठी काळ रात्र ठरली. 1 जानेवारीच्या रात्रीत दक्षिण गोव्यात दोघांजणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एका 30 वर्षीय युवतीचा तसेच 18 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

पहिली घटना 1 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजता सांकवाळ (वास्को) येथे घडली. रात्रीच्यावेळी देवराज भट्टा (31), आपली पत्नी दीपाली (29) हिला स्कुटरवरुन घेऊन जाताना त्याच्या गाडीसमोर झाडाची एक फांदी तुटून पडल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या दीपालीला मृत्यू झाला. तिला तातडीने जवळच्या इस्पितळात हलविण्यात आले. मात्र इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच तिला मृत्यू आल्याचे इस्पितळात जाहीर करण्यात आले.

दुसरी घटना 2 जानेवारीच्या पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. मडगावपासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या बाप्सोरा-बेतूल येथे झालेल्या गाडीच्या अपघातात ज्योएल फर्नाडिस या 18 वर्षीय युवकाला मृत्यू आला. सदर गाडी टेरेन्स फर्नाडिस हा चालवित होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. जखमी ज्योएलला गोमेकॉत हलवित असताना वाटेत मृत्यू आल्याचे कुंकळ्ळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Accidental death of two in South Goa on the first night of New Year

टॅग्स :Accidentअपघात