सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला

By पूजा प्रभूगावकर | Updated: September 25, 2023 19:24 IST2023-09-25T19:23:05+5:302023-09-25T19:24:02+5:30

या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव स्वप्ना मणेरीकर (३७, मेरशी)असल्याचे समजते.

A woman's body was found in a river in Santa Cruz | सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला

प्रतिकात्मक फोटो

पणजी - सांताक्रुझ येथील चार खांब शेजारील नदीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव स्वप्ना मणेरीकर (३७, मेरशी)असल्याचे समजते.

या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या काही लोकांना मृतदेह नदीत तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिस व अग्नीशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी नदीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह आढळून आल्याचे समजताच लोकांनी याठिकाणी एकच गर्दी केली होती.सदर मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या तरी ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.
 

Web Title: A woman's body was found in a river in Santa Cruz