शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

८९ पर्यावरण दाखल्यांचे निलंबन केंद्र घेणार मागे!

By admin | Updated: March 15, 2015 03:00 IST

पणजी : गोव्यातील ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन

पणजी : गोव्यातील ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दिले आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पर्यावरणमंत्र्यांशी संपर्क साधून खाणबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली आणि खाणबंदी उठविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती केली. ८९ खाण लिजांच्या पर्यावरण दाखल्यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्च रोजी सुरू होत असून २५ मार्च रोजी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वीच खाणपरवान्याची निलंबने मागे घेण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. खाणींच्या परवान्यांचे निलंबन मागे घेतल्यास खाणी लवकर सुरू होण्याची शक्यता बळावणार आहे. तसेच महसूल तुटीच्या फटक्यातून सावरण्यासाठीही सरकारला मदत होणार आहे. हा निर्णय केंद्राने लवकर घेतल्यास अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यासही सरकारला नैतिक पाठबळ मिळणार आहे. दरम्यान, खाणींच्या कॅपिंगची माहिती राज्य सरकारने केंद्राला सादर केली आहे. त्यात खाण निहाय उत्पादन मर्यादाचा उल्लेख आहे. कॅपिंगच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नसल्याचा सरकारचा दावा असून सीईसीच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)