संकलक : सुविधा रमेश फडके, शिवनाथी, शिरोडा, गोवा.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् । सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ॥ श्री शिवनाथ देवस्थानात निरनिराळे उत्सव होतात. त्यात प्रत्येक सोमवारी पालखी मिरवणूक, तसेच दसरा, नवरात्रोत्सव, रामनवमी, महाशिवरात्री, हे उत्सव होतात. मार्गशीर्ष मासातील शुक्ल चतुर्दशीपासून ६ दिवस जत्रोत्सव साजरा होतो. वर्षपद्धतीनुसार यंदा श्री शिवनाथ देवाचा जत्रोत्सव मार्गशीर्ष पौर्णिमा ते मार्गशीर्ष कृष्ण पंचमीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसह साजरा होणार आहे.
गोव्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान, हे शिरोड्यातील सर्वांत जुने देवस्थान आहे. शिरोड्याचा बाजार ओलांडून सावर्डेच्या रस्त्याने काही अंतर चालत गेल्यास ठळकपणे या देवस्थानची वास्तू नजरेत भरते. प्रत्येक गावात त्या गावचे आद्य रहिवासी असतात, त्याचप्रमाणे ग्रामदेवताही असतात.
शिरोड्यातही अशा १३ ग्रामदेवतांचे वास्तव्य आहे. गावात कोणतीही नवी गोष्ट करायची असल्यास वा धार्मिक कार्य करायचे असल्यास ग्रामस्थ प्रथम या देवतांना वंदन करतात. या सर्वांमध्ये शिवनाथाला प्रमुख स्थान आहे. मंदिरासमोर एक छोटीशी टेकडी आहे. तेथे सिद्धपुरुषाच्या पादुका आहेत. या सिद्धपुरुषाने सुमारे ५०० वर्षांपूर्वी श्री शिवनाथाची स्थापना केली, असा उल्लेख ग्रामसंस्थेच्या इतिहासात सापडतो. श्री शिवनाथाव्यतिरिक्त श्री मंडलेश्वर, श्री रवळनाथ, श्री माधव, श्री महामाया, श्री वीरभद्र, श्री वेताळ, श्री वाटो, श्री ब्रह्मदुर्गा, श्री क्षेत्रपाल, श्री खुटी भगवती, श्री नारायण देव, श्री ग्रामपुरुष आणि श्री केळबाय सातेरी, अशा इतर ग्रामदेवता आहेत. ही सर्व देवस्थाने शिरोड्याच्या पंचक्रोशीत असून या सर्व देवतांचे उत्सव ठराविक दिवशी होत असतात.
श्री शिवनाथ देवस्थानात निरनिराळे उत्सव होतात. त्यात प्रत्येक सोमवारी पालखी मिरवणूक, तसेच दसरा, नवरात्रोत्सव, रामनवमी, महाशिवरात्री, हे उत्सव होतात. मार्गशीर्ष मासातील शुक्ल चतुर्दशीपासून ६ दिवस जत्रोत्सव साजरा होतो. वर्षपद्धतीनुसार यंदा श्री शिवनाथ देवाचा जत्रोत्सव मार्गशीर्ष पौर्णिमा ते मार्गशीर्ष कृष्ण पंचमीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसह साजरा होणार आहे.
- यंदा गुरुवार ४ डिसेंबर या दिवशी सकाळी गवळण काला, सकाळी ९ वाजता पालखी, लघुरुद्र आणि अन्य धार्मिक विधी, दुपारी १ वाजता श्रींची आरती आणि महाप्रसाद, सायंकाळी ७वाजता श्री मंडलेश्वर देवाचे श्री शिवनाथ मंदिरात आगमन, तद्नंतर मुक्तद्वार, पुराण, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
- शुक्रवार, ५ डिसेंबर या दिवशी पहाटे ५.३० वाजता सांगोड (नौकाविहार) आणि रथोत्सव, दुपारी १२ वाजता दीपोत्सव (दिवजां), रात्री ८ वाजता आरती, प्रसाद आणि आशीर्वाद होईल.
- ६ डिसेंबर या दिवशी सकाळी अभिषेक आणि धार्मिक विधी, दुपारी १ वाजता आरती, रात्री ८.३० वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक, आरती आणि तद्नंतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल.
- ७ डिसेंबर या दिवशी सकाळी आभिषेक आणि धार्मिक विधी, दुपारी १ वाजता आरती, रात्री ८.३० वाजता श्रींची अश्वावरून मिरवणूक, तद्नंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल.
- ८ डिसेंबर या दिवशी सकाळी अभिषेक आणि धार्मिक विधी, दुपारी १ वाजता आरती, रात्री ८.३० वाजता श्रींची सुखासनातून मिरवणूक, तद्नंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल.
- ९ डिसेंबर या दिवशी सकाळी अभिषेक आणि धार्मिक विधी, दुपारी १ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता श्रींची लालखीतून मिरवणूक, तद्नंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून श्रींच्या कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन संस्थानच्या समितीकडून करण्यात आले आहे.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : Shiroda's ancient Shivanath temple, home to 13 deities, celebrates its annual fair with religious rituals and cultural programs from Margashirsha Purnima to Krishna Panchami. The six-day festival includes processions, a boat festival, and various cultural events, inviting devotees to seek blessings.
Web Summary : शिरोडा का प्राचीन शिवनाथ मंदिर, तेरह देवताओं का घर, मार्गशीर्ष पूर्णिमा से कृष्ण पंचमी तक धार्मिक अनुष्ठानों और सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ अपने वार्षिक मेले का जश्न मनाता है। छह दिवसीय उत्सव में जुलूस, एक नाव उत्सव और विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम शामिल हैं, जो भक्तों को आशीर्वाद लेने के लिए आमंत्रित करते हैं।