पर्यटकांच्या लुबाडणुक प्रकरणी कळंगुट येथे ५ ताब्यात

By काशिराम म्हांबरे | Updated: August 17, 2023 16:55 IST2023-08-17T16:54:45+5:302023-08-17T16:55:20+5:30

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक नायडू यांनी तक्रार दाखल केली होती.

5 detained in Calangute in case of tourist robbery | पर्यटकांच्या लुबाडणुक प्रकरणी कळंगुट येथे ५ ताब्यात

पर्यटकांच्या लुबाडणुक प्रकरणी कळंगुट येथे ५ ताब्यात

म्हापसा - कळंगुट येथील किनाऱ्यावर पर्यटना निमीत्त आलेल्या मुंबई येथील विवेक नायडू तसेच त्याच्या नातलगांना मारहाण करुन लुबाडणुक केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक नायडू यांनी तक्रार दाखल केली होती. केलेल्या तक्रारीत हा प्रकार कळंगुट येथील किनाऱ्यावर १६ आॅगस्ट रोजी रात्रीच्या वेळी घडल्याचे नमुद करण्यात आले होते.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत संशयितांना ताब्यात घेण्यासाठी कळंगुट पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर सर्व संशयितांना कळंगुट येथून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या संशयितात विनोद चव्हाण ( कळंगुट),अभिषेक राठोड ( कर्नाटक), सतीष राठोड ( कर्नाटक),  प्रेम थापा ( हिमाचल प्रदेश ) तसेच मोहन मोंडाल (  पश्चीम बंगाल ) यांचा समावेश होतो.  चौकशी दरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास  हवालदार प्रशांत चोपडेकर करीत आहेत.
 

Web Title: 5 detained in Calangute in case of tourist robbery