शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

पाच दिवसांतच गोव्याच्या किनारपट्टीवर 18 कासवांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 5:34 PM

कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले.

मडगाव - कांदोळी ते काणकोण या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात मागच्या पाच दिवसांत तब्बल 18 मृत कासव सापडल्याने गोव्यातील पर्यावरण प्रेमीमध्ये  चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांत दक्षिण गोव्यातील मुरगाव ते सासष्टी या किनारपट्टी भागात सहा मृत कासव सापडल्याने गोव्यातील कासवांचे स्थान धोक्यात आले की काय ही चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

दक्षिण गोव्यातील सासष्टी भागात झालोर (करमणो) ते फातड्रे (वार्का) या किनारपट्टी भागात केवळ 150 मीटरच्या अंतरात ऑलिव्ह रिडले जातीची तीन कासवे मरुन पडलेली दिसली. त्याशिवाय बेताळभाटी आणि माजोर्डा येथेही असे मृत कासव सापडले. मुरगावच्या जपनीस गार्डन या नावाने परिचित असलेल्या किनारपट्टीवरही एक मृत कासव सापडले. या घटनेची वनखात्याने गंभीर दखल घेतली असून या कासवांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला याची चौकशी चालू असल्याचे विभागीय वनअधिकारी सिद्धेश गावडे यांनी सांगितले.

राजबाग, कळंगूट, कांदोळी, बोगमाळो, वेळसाव आणि बेताळभाटी या किनारपट्टी भागात याआधी केवळ तीन दिवसांतच बारा मृत कासवे सापडली होती. यातील काही कासवे नुकतीच मेली होती तर काही कासवे बऱ्याच दिवसांपूर्वी वाहून आल्याचे दिसून आले होते.गोव्यातील कासव संवर्धन मोहिमेत भाग घेतलेल्या टेरा कॉन्स्क्युयसच्या पुजा मित्र यांनी या संबंधी बोलताना वाढते प्रदूषण आणि किनारपट्टीवरील प्लास्टीक आणि इतर कच:यात झालेली वाढ यामुळेच ही कासवे मरु लागली आहेत. ही गोष्ट चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्या किनारपट्टी भागात कासवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्या भागात मासेमारी प्रमाणोच जलक्रीडा प्रकार मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले जातात. कासवे मरण्याचे हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. कित्येकवेळा जलक्रीडा प्रकारात ज्या हायस्पीड बोटी असतात त्यांना आपटून कासवे मरतात. कित्येकदा ती मासेमाऱ्यांच्या जाळ्यातही सापडतात मात्र मासेमारी या कासवांना जाळ्यातून सोडविण्यापेक्षा आपले जाळे फाटू नये यासाठी कासवाच्या पायाकडील भाग कापून त्यांना मोकळे करतात. अशी जखमी झालेली कासवे नंतर फार काळ जिवंत राहू शकत नाहीत अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सागरातील प्लास्टीकचे वाढते प्रमाण हेही कासवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते अशी माहिती वन खात्याचे सहाय्यक वनपाल आनंद जाधव यांनी दिली. ते म्हणाले, पाण्यातील जेली फिश हे कासवाचे खाद्य असते. हे जेली फिश पाण्यावर तरंगत असताना कासवे त्यांना खातात. कित्येकदा पाण्यावर पडलेले प्लास्टीक कासवांना या जेली फिशसारखे दिसल्यामुळे हे प्लास्टीकही ते खातात. कित्येकदा हे प्लास्टीक त्यांच्या तोंडाला चिकटते. कित्येकदा त्यांच्या नाकात ते जाते त्यामुळे गुदमरुन कासवे मरतात. पाण्यात मरुन पडलेली ही कासवे नंतर दर्याच्या लाटाबरोबर किनारपट्टीवर येऊन पडतात अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवा