शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

१४ एचआयव्ही बाधीत मुलांच्या प्रवेशास शाळा तयार

By admin | Updated: June 23, 2014 01:38 IST

वादाचा सुखांत : गैरसमजामुळे पालकांमध्ये होती भीती

केपे : केपे तालुक्यातील चौदा एचआयव्ही बाधीत विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेण्याची तयारी या परिसरातील एका शाळेने दाखवली आहे. त्यामुळे या वादग्रस्त विषयावर पडदा पडला. या आई-वडील नसलेल्या १४ मुलांना सामावून घेणाऱ्या जांबावली येथील एका नन्स होम समोर ही बिकट समस्या निर्माण झाली होती. या आश्रमात असलेल्या चोवीस विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेण्यासाठी जवळच्या विद्यालयांनी नकार दिला होता. या चाळीसपैकी चौदा विद्यार्थी एचआयव्ही बाधीत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत घेतल्यास आम्ही आमच्याही पाल्यांना शाळेबाहेर काढू, असा इशारा पालकांनी दिला होता. त्यामुळे ही समस्या बिकट झाली होती. या संदर्भात जांबावलीच्या नन्स होमकडे संपर्क साधला असता या मुलांना शाळेत घेण्याची शाळा व्यवस्थापनाने तयारी दाखवली आहे. त्यामुळे हा प्रश्न निकालात लागला आहे, अशी माहिती सिस्टर आफोन्सो यांनी दिली. परत काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून या शाळेचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. एचआयव्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात भेदभाव करू नये, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिला आहे. त्यामुळे या मुलांना सर्वसाधारण मुले शिकत असलेल्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय नन्स होमने घेतला होता. यापूर्वी ही मुले त्या नन्स होममध्येच शिकत होती. एचआयव्ही बाधीत मुलांनी सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण घेतल्यास या व्याधीचा आपल्या मुलांना प्रादुर्भाव होईल, अशी भीती या पालकांना होती. याचे कारण एचआयव्ही संदर्भात फारशी माहिती या पालकांना नव्हती, त्यामुळे त्यांनी या प्रयत्नाला विरोध केला होता. या मुलांना सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण दिल्यास कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, हे समजावून सांगण्यात आले. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश काकोडकर, तसेच असोसिएशन आॅफ पीस अ‍ॅण्ड जस्टीज फादर नेवरीक यांनी पालकांशी संवाद साधला. (विशेष प्रतिनिधी)