शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले

By किशोर कुबल | Updated: November 28, 2023 12:28 IST

इफ्फी, जुने गोवें चर्चचे फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

किशोर कुबल/ पणजी

पणजी : इफ्फी, जुने गोवेतील प्रसिध्द चर्चचे येऊ घातलेले फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची मौजमस्ती चालू असून अनेकदा ती जीवावरही बेतते. गेल्या आठवडाअखेर बुडताना १३ पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील पर्यटकांचा यात समावेश होता. गोव्यात आल्यावर अनेकांना समुद्रात उतरण्याचा मोह आवरत नाही. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसल्याने मोठ्या लाटांसोबत पाण्यात ओढले जाऊन प्राण गमावण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळेच २००८ साली गोव्याच्या किनाय्रांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले. मुंबईची दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनी जीवरक्षकांची सेवा देते.

दृष्टी लाइफसेव्हिंगच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की, हरमल किनाय्रावर विलासपूर, छत्तीसगढमधील  चार पुरुषांना जीवरक्षक अमित कोळंबकर आणि उमेश फडते यांनी जेट स्कीच्या साहाय्याने मदतकार्य करीत वाचवले. हैदराबादचा २५ वर्षीय युवक तसेच राजस्थानचा २३ वर्षीय युवक या दोघांनाही याच किनाय्रावर बुडताना वाचवले. दोघेही पोहताना प्रचंड प्रवाहात अडकले, जेव्हा दृष्टी सागरी जीवरक्षक प्रीतेश कुबल, चेतन बांदेकर आणि नवनाथ घाटवळ यांनी रेस्क्यू बोर्ड, रेस्क्यू ट्यूब आणि जेट स्की घेऊन त्यांना वाचवले.

बागा समुद्रकिनाऱ्यावर, कर्नाटक आणि पुणे येथील २२ ते २६ वर्षीय वयोगटातील पाचजणांना जीवरक्षक फोंडू गावस, उमेश मडकईकर, दिवाकर देसाई, साईनाथ गावस आणि मंथा किनळकर यांनी बचाव कार्यात वाचवले. यापैकी एक बुडू लागला होता त्याला वाचवण्यासाठी अन्य चार मित्रांनी प्रयत्न केला असता तेही प्रवाहात अडकले.  जीवरक्षकांनी पाचहीजणांना सुखरूप परत किनाऱ्यावर आणले व प्रथमोपचार दिले.

मांद्रे बीचवर एकाला, कलंगुट बीचवर ३६ वर्षीय रशियन महिलेला तसेच २१ वर्षीय बंगळुरुच्या युवकाला प्रवाहात सापडले असता जीवरक्षक रोहित हिरनाईक आणि दर्पण रेवांका यांनी वाचवले. दरम्यान, आणखी एका घटनेत कळंगुट आणि बागा बीचवर गर्दीत हरवलेली दोन मुले, मध्य प्रदेशातील चार वर्षांची मुलगी आणि मुंबईतील एक मूल जीवरक्षकांनी शोधून काढून पालकांच्या स्वाधिन केले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी