शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

गोव्यावर 12.39 हजार कोटी कर्ज, ७ महिन्यात घेतलं १०हजार कोटी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 4:50 PM

राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असून मागील सात महिन्यातच खुल्या मार्केटमधून फार मोठी म्हणजे १० हजार कोटी रुपये एवढे कर्जे उचलले असल्याची माहिती गोवा विधानसभेत देण्यात आली.

पणजी- राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असून मागील सात महिन्यातच खुल्या मार्केटमधून फार मोठी म्हणजे १० हजार कोटी रुपये एवढे कर्जे उचलले असल्याची माहिती गोवा विधानसभेत देण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्यावर १२.३९ हजार कोटी रुपये कर्ज बाकी होते. 

गोवा सरकारने केंद्राकडून व विविध माध्यमातून कर्ज मिळविण्याचा धडाका लावला असून कर्जाचा बोजा हा वाढतच आहे. मे ते नोव्हेंबर २०१७ या काळात सरकारकडून सहावेळा कर्जे घेण्यात आली. ही सर्व कर्ज खुल्या मार्केटमधून घेण्यात आली आहेत. खुल्या मार्केटमधील कर्जांवर व्याज दर अधिक आकारला जात असल्यामुळे गोव्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरू शकते. 

सर्व कर्जे ही विकास कामांच्या नावाखाली  घेण्यात आली आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यातच ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४७.७१ कोटी रुपये बाह्य अनुदानीत प्रकल्पांअंतर्गत घेण्यात आले आहेत. २८.५९ कोटी हे नाबार्डकडून तर १२ लाख हे एनसीडीसीकडून मिळविण्यात आले आहेत. 

राज्यावर मोठे कर्ज असले तरी कर्जाची परतफेडीची प्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. खनिज बंदीमुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे कर्जे घेऊन विकास कामे करावी लागली अशी सफाई बऱ्याचवेळा सरकारकडून विधानसभेत देण्यात आली आहे. परंतु २०१२ ते २०१७  या काळात राज्याच्या एकूण उत्पादनातही वाढ झाली आहे. २०१२ -१३ या काळात ठोकळ उत्पादन होते ३८.१२ कोटी रुपये. त्यानंतर पुढील तीन वर्षांत ते अनुक्रमे ३५.९२ कोटी, ४७.८१ आणि ५४.२७ कोटी रुपये असे वाढत गेले, आणि २०१६ -१७ या वर्षी ते ६४.४४ कोटी रुपये एवढे झाले.

कर्जमाफीच्या निकषात अंशत: बदलसन २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यत केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना २०१५-१६ या कालावधीसाठी पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजारापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शासनाकडून मिळणार आहे. ही रक्कम १५ हजारांपेक्षा कमी असल्यास  संपूर्ण रक्कम शेतकºयांना परत केली जाईल. सन २०१६-१७ या कालावधीतील पीक कर्जाचा देय दिनांक ३१ जुलै २०१७ नंतर असल्यास, अशा लाभार्थींना परतफेडीवर याच स्वरूपाचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, असा सुधारित बदल सहकार विभागाने केला.

टॅग्स :goaगोवा