शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. च्या माध्यमातून विकासाला गती देणार

By admin | Updated: April 4, 2017 00:54 IST

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका आठवड्याच्या आत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने करावी, ...

योगीता भांडेकर : १२०० कोटींच्या तरतुदींसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादररत्नाकर बोमिडवार चामोर्शीजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर एका आठवड्याच्या आत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने करावी, यासंदर्भाचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. जि. प. च्या माध्यमातून जिल्हा विकासाला गती देण्यासाठी आपण प्रसंगी धाडसी निर्णय घेणार, अशी माहिती जि. प. चे अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी दिली. प्रस्तुत प्रतिनिधींनी जि. प. अध्यक्ष भांडेकर यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. याप्रसंगी भांडेकर यांनी जिल्हा विकासाच्या विविध संकल्पना मनमोकळेपणाने मांडल्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रशस्त इमारती तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. यासाठी १२०० कोटींचा निधी आवश्यक आहे. शेतकऱ्यांची धान विक्री व्यवहारातील लूट थांबण्यासाठी कृषी गोदामांची गडचिरोली जिल्ह्यात संख्या वाढणे आवश्यक आहे. ग्राम पंचायतस्तरावर कृषी गोदाम निर्माण करण्यासाठी ३० कोटी रूपये, दुर्गम भागात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी १६ प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी ६३ कोटी ६९ लाख रूपयांचा प्रस्ताव आपण तयार केला आहे. याशिवाय शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आदी विभागाच्या योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांचा आढावा घेऊन हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. सदर प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्ह्यातील आमदारांकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा विकासासाठी निधी मिळण्याकरिता आपण पाठपुरावा करणार, अशी माहिती जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी यावेळी दिली.५१ जिल्हा परिषद क्षेत्र व १०२ पंचायत समिती गण आणि ४५६ ग्राम पंचायती असा अवाढव्य पसरलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेचा कारभार महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणे मोठे आव्हानात्मक आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी महिलेने स्वीकारली. हे एकप्रकारचे धाडसच आहे. हे धाडस केले, चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील योगीता मधुकर भांडेकर या २७ वर्षीय महिलेने. योेगीतांनी समन्वयातून विकासाचा मानस व्यक्त केला आहे. अर्थशास्त्रातून झाले उच्च शिक्षणयोगीता मधुकर भांडेकर या पूर्वश्रमीच्या योगिता रिंगाजी सोमनकर होत. मूळचे आरमोरी परंतु ब्रह्मपुरी येथे स्थाईक झालेले व तहसील कार्यालयात लिपीक पदावर असलेले रिंगाजी सोमनकर यांची योगीता ही मुलगी आहे. योगीताचा नकूल नामक एक भाऊ अमरावती येथे जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहे. दुसरा भाऊ प्रणव याने बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले असून तो आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. स्वत: योगीताने अर्थशास्त्र विषयात एम.ए.बी.एड्. चे शिक्षण पूर्ण केले. सुशिक्षित व सुसंस्कारीत कुटुंबात योगीताचा जन्म झाला. सासरकडून मिळाला राजकीय वारसायोगीता सोमनकर यांचा विवाह वालसरा येथील मधुकर केशव भांडेकर यांचेशी २०१४ मध्ये झाला. माहेरकडून कोणताही राजकीय वा सामाजिक वारसा योगीतांना लाभला नाही. मात्र लग्नानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्राशी घनिष्ठ संबंध असलेल्या भांडेकर कुटुंबीयांकडून योगीताला राजकारणाचे बाळकडू मिळाले. राजकीय सामाजिक वारसा लाभलेल्या भांडेकर घराण्याची योगीता सून झाली. केवळ तीन वर्षात सासरकडील मंडळीच्या प्रेरणेने सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगीताने आपले पाय घट्ट रोवले. पती मधुकर भांडेकर हे सिव्हील व मेकॅनिकल डिप्लोमा प्राप्त असून स्वयंरोजगार करतात. योगीता व मधुकर या दाम्पत्याला दीड वर्षाची स्वरा नामक मुलगी आहे. योगीताचा दीर रामचंद्र नागपूर जिल्ह्याच्या पंचायत समिती कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे.