शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. राकाँ-काँग्रेस आघाडीच्या ताब्यात

By admin | Updated: September 21, 2014 23:49 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य

भाजपातील अंतर्गत वाद उफाळले; भाजप सदस्यांनीही केले काँग्रेसलाच मतदानगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील नाट निवडून आले आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कुत्तरमारे यांना २८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वर्षा कौशिक यांना २२ मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जीवन नाट यांना २८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांना २० मते मिळाली. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत मतदानाला युवाशक्ती आघाडीच्या तिकीटावर निवडून आलेल्या पल्लवी लाडे या सदस्य गैरहजर होत्या. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे यशवंत धुळसे व भाजपचे सहयोगी अपक्ष सदस्य नामदेव सोनटक्के तटस्थ राहिले. गेल्यावेळी या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप, अशी सत्ता होती. यावेळी काँग्रेस-राकाँ आघाडीला यश मिळाले आहे.५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी पार पडली. सकाळी ११.३० वाजतापासून निवडणूक प्रक्रियेला जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात प्रारंभ झाला. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीकडून परशुराम कुत्तरमारे, भारतीय जनता पक्षाकडून संध्या तामदेव दुधबळे व पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती आघाडीच्या व आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वर्षा कौशिक, भाजपचे यशवंत धुळसे व काँग्रेसचे जीवन नाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पाच सदस्यांचे सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर उपाध्यक्ष पदासाठी सहा सदस्यांनी १० नामांकन अर्ज दाखल केलेत. यामध्ये काँग्रेस-राकाँ आघाडीतर्फे जीवन पाटील नाट, वसा-पोर्ला क्षेत्राचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ भोवते, अपक्ष सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, सुरेंद्रसिंह चंदेल गटाच्या विद्यमान बांधकाम सभापती छाया कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ बंडखोर नेते अतुल गण्यारपवार व भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संध्या दुधबळे, यशवंत धुळसे व जीवन नाट यांनी आपले अर्ज मागे घेतले. तर उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणारे विश्वनाथ भोवते, जगन्नाथ बोरकुटे, छाया कुंभारे, डॉ. तामदेव दुधबळे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी काँग्रेस-राकाँ आघाडीचे परशुराम कुत्तरमारे व नव्यानेच भाजपात दाखल झालेल्या वर्षा कौशिक यांच्यात लढत झाली. या लढतीत परशुराम कुत्तरमारे यांना २८ तर कौशिक यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे जीवन नाट व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांच्यात लढत झाली. नाट यांना २८ तर गण्यारपवार यांना २० मते मिळाली. या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नामदेव सोनटक्के व यशवंत धुळसे हे दोन सदस्य तटस्थ राहिले व भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे, संध्या दुधबळे यांनी काँग्रेसचे जीवन नाट यांना मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रणजितकुमार, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी देवेंद्रसिंह यांनी काम पाहिले.