हात बांधून युवकाची स्वत:च्या घरातच गळा दाबून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 12:46 IST2021-12-21T12:41:43+5:302021-12-21T12:46:05+5:30

सुबोधच्या घरचे रविवारी सकाळी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेले हाेते. तो घरी एकटाच हाेता. साेमवारी रात्री ७.३० वाजता आईवडील घरी परतले असता सुबाेधचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत पलंगावर पडून असल्याचे दिसून आले.

A youth was strangled to death in his own house with his hands tied | हात बांधून युवकाची स्वत:च्या घरातच गळा दाबून हत्या

हात बांधून युवकाची स्वत:च्या घरातच गळा दाबून हत्या

ठळक मुद्देचाेरीच्या प्रयत्नातून हत्या झाल्याचा संशय

गडचिराेली : दाेन्ही हात बांधून गळा दाबून निर्घुणपणे एका युवकाची त्याच्याच घरात हत्या करण्यात आली. ही घटना दुसऱ्या दिवशी साेमवारी रात्री ७.३० वाजता उघडकीस आली. चाेरीच्या उद्देशाने ही घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुबाेध केलसडीन जनबंधू (२०, रा. आशीर्वादनगर गडचिराेली) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. सुबाेधचे आईवडील व लहान भाऊ रविवारी सकाळी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेले हाेते. सुबाेध हा घरी एकटाच हाेता. साेमवारी रात्री ७.३० वाजता आईवडील घरी परतले असता सुबाेधचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत पलंगावर पडून असल्याचे दिसून आले. यानंतर तत्काळ पाेलिसांना पाचारण करण्यात आले.

सुबोधचे हात मोबाईल चार्जरच्या वायरने मागच्या बाजून बांधलेले होते. तसेच, तोंडावर प्लास्टिक असल्याचे दिसून आले. सुबाेध हा अतिशय साधा व शरीराने थाेडा अशक्त हाेता. त्यामुळे त्याचे काेणत्याही व्यक्तीसाेबत वैर नव्हते.

चाेरट्यांनी सुबाेधच्या घरातील आलमारी फाेडून त्यातील काही साेन्याच्या वस्तू लंपास केल्या. चाेरटे हे सुबाेधच्या ओळखीचे असावेत. आपले बिंग फुटेल या भीतीपाेटी त्यांनी सुबाेधची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुबाेधच्या आराेपींना शाेधण्याचे आव्हान गडचिराेली पाेलिसांसमाेर आहे.

Web Title: A youth was strangled to death in his own house with his hands tied