युवकच समाज परिवर्तनाचा खरा कणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:56+5:302021-09-21T04:40:56+5:30
मेळावाच्या अध्यक्षस्थानी आ.धर्मरावबाबा आत्राम होते. उद्घाटन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून रायुकाँचे ...

युवकच समाज परिवर्तनाचा खरा कणा
मेळावाच्या अध्यक्षस्थानी आ.धर्मरावबाबा आत्राम होते. उद्घाटन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून रायुकाँचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हा प्रभारी जगदीश पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, ऋषिकांत पापडकर, बबलू हकीम, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, श्रीनिवास गोडशेलवार, तुकाराम पुरणवार, लीलाधर भरडकर, संजय कोचे, विवेक बाबनवाडे, श्याम धाईत, योगेश नांदगाये, विजय धकाते आदी उपस्थित होते. धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असून, सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी भाग्यश्री आत्राम, रवींद्र वासेकर यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी रिक्त असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मेहबूब शेख यांनी मुलाखती घेतल्या. प्रास्ताविक रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस ऋषिकांत पापडकर, संचालन कुलदीप सोनकुसरे, तर उपस्थितांचे आभार कृपाल मेश्राम यांनी मानले.
(बाॅक्स)
आदिवासी संस्कृतीची करून दिली ओळख
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची सर्वदूर ओळख आहे. आदिवासी संस्कृती व परंपरेची ओळख करून देण्यासाठीच खास भामरागडचा माडिया समाज वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणाहून बांबूपासून बनविलेली टोपी (रेखी) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेहबूब शेख व रविकांत वरपे यांना भेट देऊन परिधान करायला लावली. या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची ओळख करून दिली.