कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे फिरते मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:16+5:302021-04-24T04:37:16+5:30
या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देणे, त्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत ...

कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसचे फिरते मदत केंद्र
या मदत केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देणे, त्यांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, इंजेक्शन व इतर अडचणींचे निवारण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था करून देणे, बाहेर जिल्ह्यत अडकलेल्या रुग्णांच्या अडचणी दूर करणे, उपचारादरम्यान हेळसांड होत असल्यास समस्या निवारण करणे, रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्वरित रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देणे, मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध करून देणे, अशा विविध अडचणींसाठी गडचिरोली युवक काँग्रेस मदत करणार आहे.
गरजवंतांनी महेंद्र ब्राम्हणवाडे (८८३०७३७८९०), मिलिंद खोब्रागडे (९४२१८५४५०८), आकाश परसा (९४०३२३२८७१), रजनीकांत मोटघरे (९४२१७३४१९५), गौरव येनप्रेडीवार (९५८८६४३१८७), नीतेश राठोड (९४२२६८०४१२), पिंकू बावणे (८८०६२५९८७०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.