शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात योग दिनाचा ज्वर तापला

By admin | Updated: June 19, 2015 01:36 IST

संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून जाहीर केला आहे.

शाळा, विद्यापीठ झाले सज्ज : प्रशिक्षक देत आहे विविध ठिकाणी जाऊन धडे; रस्त्यावरही योगाचे प्रयोग
गडचिरोली : संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून जाहीर केला आहे. भारतात पहिल्यांदाच या निमित्ताने यंदा योगदिनाचे आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्य सरकारनेही या दृष्टीने पुढाकार घेतला असून शाळा, महाविद्यालय यांना योगदिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे योगदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्येक तालुका मुख्यालयात गटसाधन केंद्रात शिक्षकांना बोलावून योग अभ्यासकांकडून त्यांना प्रात्याशीकाचे डोज दिले जात आहे. सकाळी ६ ते ८ या कालावधीत योगदिनाचे आयोजन करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिले आहे. तर गडचिरोली स्थित गोंडवाना विद्यापीठातही २१ जून रोजी आर्ट आॅफ लिव्हिंगचे शिक्षक अमोल दशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. मुर्लीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते आदींसह कर्मचारी उपस्थित राहणार आहे. यावेळी सुर्यनमस्कार, योगासन, ध्यानसाधना आदींचे प्रशिक्षण सकाळी ७ ते ७.३५ या कालावधीत दिले जाणार असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पतंजली योग समितीच्या माध्यमातून योगासंदर्भात प्रशिक्षण व जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आरमोरी येथे दररोज सकाळी मार्निंग वॉकला जाणाऱ्या क्लब मेंबरांनी या दिनानिमित्त योगसाधना सकाळच्या वेळेत मुख्य मार्गावरच सुरू केली आहे. सोशल मीडियावरूनही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योगाचे जीवनातील महत्त्व विषद करणारे लेख गु्रपच्या माध्यमातून अ‍ॅपच्या सहाय्याने पाठवित आहे. तर २१ जून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हेडगेवार गुरूजी यांचा स्मृतीदिन असल्याने भाजप सरकारने योगदिन साजरा करण्याचे काम सुरू केले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. एकूणच योगादिनानिमित्त शहरी व ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. शाळा २६ जूनला सुरू होणार असल्याने २१ जूनच्या योग दिनानिमित्त किती विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहतात. याबाबत शैक्षणिक वर्तुळात मात्र शासंकता व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)