शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

यावर्षी धान खरेदीसाठी जिल्हाभरात 113 केंद्रे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST

धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या शेतकऱ्यांची ३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा खरीप हंगामातील धान, शासकीय आधारभूत किमतीनुसार विक्री करण्यासाठी, जिल्हाभरात ११३ खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, त्यातील अनेक केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. त्यात बिगरआदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत १८ केंद्रे, तर उर्वरित ९५ केंद्रे आदिवासी विकास महामंडळामार्फत चालविली जात आहेत. त्यांतील ५६ केंद्रे प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली तर ३९ केंद्रे अहेरी यांच्यामार्फत चालविली जाणार आहेत.धान खरेदीचा कालावधी खरीप पणन हंगामासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तसेच रब्बी / उन्हाळी हंगाम १ मे ते ३० जून २०२२ असा राहणार आहे. धान विक्रीकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. वनहक्क धारणाधिकार असलेल्या शेतकऱ्यांची ३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. धान उत्पादकांनी खासगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजारदराने धानाची विक्री केली असल्यास त्यांना चालू वर्षाचा नमुना सातबारा व बँक खात्यांचा तपशील देणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले आहे.

टीडीसीचे उत्तर भागातील खरेदी केंद्र -    कोरची तालुका- कोरची, मसेली, बेतकाठी, मर्केकसा, कोटगुल, बेडगाव, चर्वीदंड, बोरी, कोटरा. -    कुरखेडा तालुका- रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, कुरखेडा, कढोली, आंधळी, पलसगड, गोठणगाव, गेवर्धा, देऊळगाव, सोनसरी, खरकाडा, नान्ही, उराडी, अंगारा.-    आरमोरी तालुका - देलनवाडी, दवेडी, कुरुंडीमाल-    देसाईगंज तालुका - पिंपळगाव -    गडचिरोली तालुका - मौशीखांब, पोटेगाव, चांदाळा-    धानोरा तालुका - धानोरा, मुरुमगाव, रांगी, दुधमाळा, कारवाफा, मोहगाव, मोहली, सोडे, चातगाव, गट्टा, येरकड, सावरगाव, सुरसुंडी,-    चामोर्शी तालुका- घोट, मक्केपल्ली, गुंडापल्ली, भाडभिडी, सोनापूर, आमगाव, मार्केडा, पावीमुरांडा, रेगडी, गिलगाव

टीडीसीचे दक्षिण भागातील खरेदी केंद्र-    अहेरी तालुका - अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगुर, इंदाराम-    सिरोंचा तालुका- असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद-    एटापल्ली तालुका - एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर-    अहेरी तालुका - उमापूर, आलापल्ली, पेरमिल्ली, जिमलगट्टा, देचलीपेठा-    मुलेचरा -  लगाम, मुलचेरा-    सिरोंचा - सिरोंचा, झिंगानूर, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, पेंटीपाका-    भामरागड - भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेराजाराम-    एटापल्ली - कसनसूर, जारावंडी, गेदा, कोठमी, हालेवारा, उडेरा (बुर्गी), हेडरी

- तर दाखल होणार फौजदारी गुन्हा

आधारभूत योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाच्या धानाकरिता प्रतिक्विंटल १९६० रुपये तर साधारण धानाकरिता प्रतिक्विंटल १९४० रुपये राहणार आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने संबंधित केंद्रावर धान विक्री करण्यासाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांचा सन २०२१-२२ मधील पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेला नाही. सद्य:स्थितीत प्रतिहेक्टरी २४.०३ क्विंटल धान उत्पादकता ठरवून दिलेली आहे. पीककापणी प्रयोग अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यात बदल (कमी/जास्त) होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड