जागतिक देशांनी आण्विक अस्त्रांचा वापर टाळण्याची गरज
By Admin | Updated: August 9, 2014 01:11 IST2014-08-09T01:11:51+5:302014-08-09T01:11:51+5:30
स्पर्धेच्या युगात अनेक देश शस्त्रास्त्रांची स्पर्धा करीत आहेत. परंतु शस्त्रास्त्र, आण्विक अस्त्र हे मानवी विकासास तारक नसून मारक आहेत.

जागतिक देशांनी आण्विक अस्त्रांचा वापर टाळण्याची गरज
गडचिरोली : स्पर्धेच्या युगात अनेक देश शस्त्रास्त्रांची स्पर्धा करीत आहेत. परंतु शस्त्रास्त्र, आण्विक अस्त्र हे मानवी विकासास तारक नसून मारक आहेत. जगात आण्विक अस्त्रांचा वाढता वापर टाळण्याची गरज आता आली आहे, असा सूर वादविवाद स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी काढला.
स्थानिक शासकीय विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘अस्त्र शाप की वरदान’ या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे होते. कार्यक्रमात ६ आॅगस्ट व ९ आॅगस्ट १९४५ रोजी जागतिक महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या जीवित, नैसर्गिक, आर्थिक हानीसंदर्भात वादविवाद स्पर्धेत मंथन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात आण्विक अस्त्रामुळे झालेल्याई दुष्परिणामांची परिणामकारकता लक्षात घेऊन यापुढे जागतिक महायुद्ध घडू नये, म्हणून प्रत्येक राष्ट्राने खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे विचारही अनेक स्पर्धकांनी मानले. स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक नरेश सोमनकर, द्वितीय प्रतीम लोणारे यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. व्ही. आर. पांडे यांनी केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत अष्टपुत्रे, संचालन रोहिणी कांबळे तर आभार नरेश सोमनकर यांनी मानले. शुभम नैताम, हर्षल करचल, सादिया सय्यद, ताजणे यांनी सहकार्य केले.