आरमोरीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा
By Admin | Updated: June 21, 2014 23:59 IST2014-06-21T23:59:12+5:302014-06-21T23:59:12+5:30
पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा

आरमोरीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा
आरमोरी : पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा स्तरावर वर्षभर राबविण्यात येणाऱ्या शालेय उपक्रमांसह सहशालेय उपक्रमांविषयी नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करण्यात आले.
२६ जूनला सर्वच शाळा सुरु होत आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वच शाळेतील मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा येथील केंद्र शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी पितांबर कोडापे , विस्तार अधिकारी नरोटे, केंद्रप्रमुख वसंत राऊत, सुरेश मेश्राम, शंकर बोरकर, डुंबरे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करणे, पटनोंदणी पंधरवाडा, शाळा प्रवेश उत्सव, पालकांच्या भेटी , नवागतांचे स्वागत, शालेय गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, अभ्यासक्रमाचे वर्गनिहाय नियोजन, शिक्षणाधिकारी यांचे वर्षभरात राबवायचे उपक्रम, केंद्रप्रमुखांचे उपक्रम, शालेय रंगरंगोटी, शालेय स्वच्छता, तसेच यावर्षीपासून जिल्हा परिषद शाळेत सुरु होणाऱ्या ५ व ८ व्या वर्गासंबंधी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. येत्या शैक्षणिक सत्रापासून सर्वच शिक्षकांना आपले ओळख पत्र लावावे लागतील, या विषयी कार्यशाळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या कार्यशाळेचे संचालन राजेश धात्रक तर आभार प्रदर्शन गुलाब मने यांनी मानले.
कार्यशाळेला आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)