शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सक्षमीकरणासाठी महिला एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 01:02 IST

स्त्री सध्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. परंतु दररोज महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात. महिलांचे अधिकार व हक्क अबाधित राहावे,....

पणती स्त्रीशक्ती संघटनेची स्थापना : महिला व बालकल्याणावर राहणार भरगडचिरोली : स्त्री सध्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. परंतु दररोज महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात. महिलांचे अधिकार व हक्क अबाधित राहावे, अन्यायाच्या परिमार्जनासाठी स्त्रिया एकजूट व्हाव्या या हेतूने गडचिरोली येथे ‘पणती स्त्री शक्ती संघटने’ची स्थापना शनिवार ८ एप्रिलला करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात संघटनेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटच्या परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून शकुंतला पद्मावार यांचा सत्कार शिक्षिका वंदना मुनघाटे, स्मिता लडके यांच्या हस्ते करण्यात आला. महिला सक्षमीकरण व बालकल्याण ही या संघटनेची उद्दिष्ट्ये असून समाजातील गरजवंतांना मदत करणे हा प्रमुख उद्देश आहे. याप्रसंगी निकिता पारपेल्लीवार यांनी प्रार्थना व गीते सादर केली. संघटनेच्या संयोजिका प्राचार्य सविता सादमवार यांनी सर्व महिलांना शपथ दिली व संघटनेच्या पुढील कार्यवाही संदर्भात चर्चा घडवून आणली. दरम्यान महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी वंदना मुनघाटे, स्मिता लडके, प्राचार्य लीना हकीम, प्रा. योगिता सानप, छाया पद्मावार, सुनंदा खोरगडे, डॉ. सुधा सेता, माधुरी दहीकर, वर्षा चडगुलवार, प्रा. वैैशाली येगोलपवार, प्रा. अर्चना चंदनपाट, चंदनखेडे, कांचन चौधरी, प्रा. विजया चव्हाण, रिझवाना पठाण, लक्ष्मी केतकर व ४० ते ५० महिला उपस्थित होत्या. संचालन करिश्मा राखुंडे यांनी केले. तीन महिन्यांपूर्वी विशिष्ट उद्देशाने महिलांची व्हॉट्सअ‍ॅपवर संघटनात्मक बांधणी करण्यात आली. पुणे, मुंबईपासून विविध क्षेत्रातील महिला यात सहभागी झाल्या. ८ मार्चला महिलांचा आॅनलाईन परिचय देण्यात आला. यात पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संचालिका मंगल शहा सहभागी झाल्या. त्यामुळे शहरात स्त्रीशक्ती मोठ्या प्रमाणात एकजूट होण्यास मदत झाली. (शहर प्रतिनिधी)