महिलांनी आत्मनिर्भर होऊन प्रगती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:12 PM2018-01-08T23:12:26+5:302018-01-08T23:13:11+5:30

कौटुंबिक जीवन जगताना महिलांनी केवळ चूल व मूल यात गुरफटून न राहता विविध क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी होऊन स्वत:सह कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.

Women should progress through self-reliance | महिलांनी आत्मनिर्भर होऊन प्रगती साधावी

महिलांनी आत्मनिर्भर होऊन प्रगती साधावी

Next
ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : चांदाळा येथील मेळाव्यात महिलांनी दाखविले कलाकौशल्य

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कौटुंबिक जीवन जगताना महिलांनी केवळ चूल व मूल यात गुरफटून न राहता विविध क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी होऊन स्वत:सह कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
तालुक्यातील चांदाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सोमवारला महिला मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, पं.स. सदस्य जान्हवी भोयर, शिक्षिका वंदना मुनघाटे, प्राचार्य सविता गोविंदवार, सरपंच राजेंद्र मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. बुरांडे, हरीश सिडाम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम भर्रे, केंद्रप्रमुख दुष्यांत तुरे, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, तंमुस अध्यक्ष सुरेश बांबोळे, हिरापूरचे उपसरपंच निसार, ग्रा.पं. सदस्य उषा गावडे, कोराम, यादव गोमस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुखरू डोंगरे, पोलीस पाटील धनिका मेश्राम, वि.दा. सावरकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मुळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक जी.टी. कड्यामी, रानभूमी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दरडे, रानमूल शाळेचे मुख्याध्यापक मनोज नाईक उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार डॉ. उसेंडी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिलांना स्वातंत्र्यही नव्हते. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे भारत देशातील महिला ह्या राष्टÑपती, लोकसभा अध्यक्ष व पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या. मात्र सध्याच्या काळात पुन्हा शिक्षण क्षेत्रात तशी परिस्थिती आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे महिलांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच राजेंद्र मेश्राम यानी केले तर संचालन प्रभाकर साखरे तर आभार नरूले यांनी मानले. यावेळी जि.प. प्राथमिक शाळा चांदाळा, वि.दा. सावरकर आश्रमशाळा, अनुदानित माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला चांदाळा, चांदाळा टोला, रानभूमी, रानमूल, कुंभी, विहिरगाव, आदी गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महिलांनी स्पर्धांमधून विविध प्रकारचे कलाकौशल्य दाखविले.
कबड्डी स्पर्धेत चांदाळा टोलाच्या संघाने मारली बाजी
सदर मेळाव्यात महिलांकरिता, कबड्डी, रांगोळी, रस्सीखेच, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डी स्पर्धेत चांदाळा टोला येथील महिलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर चांदाळाचा संघ दुसºया स्थानावर राहिला.
विजेत्या संघांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र मेश्राम, सुरेश बांबोळे, मुकेश डोंगरे, डॉ. बुरांडे, प्रभाकर साखरे, दुष्यांत तुरे, जी. टी. कड्यामी व वर्षा रायसिडाम यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनाही सन्मानित करण्यात आले.

Web Title: Women should progress through self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.