महिलांनी जप्त केली गावठी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:41+5:30
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारूची विक्री केली जात आहे. दारू गाळण्यासाठी झाडेझुडूपे व नदी, नाल्याच्या काठाचा आधार घेतला जातो. दारू काढल्यानंतर गावात आणून राहत्या घरातून विक्री केली जाते. बुधवारी गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना याबाबत माहिती मिळाली.

महिलांनी जप्त केली गावठी दारू
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा व कंबालपेठा येथे राहत्या घरातून दारूची अवैधरीत्या विक्री होत असल्याची माहिती मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडे गावठी दारू जप्त केली. त्यानंतर सदर दारू चौकात आणून नष्ट करून साहित्याची होळी करण्यात आली.
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारूची विक्री केली जात आहे. दारू गाळण्यासाठी झाडेझुडूपे व नदी, नाल्याच्या काठाचा आधार घेतला जातो. दारू काढल्यानंतर गावात आणून राहत्या घरातून विक्री केली जाते. बुधवारी गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना याबाबत माहिती मिळाली. महिलांनी एकजूट होऊन अवैध दारूविक्रेत्यांच्या घरावर सुमिता भोगर यांच्या नेतृत्वात धाड टाकली. त्यानंतर गावातील शिवाजी चौकात साहित्याची होळी करण्यात आली.
दिवसभर कारवाई
अंकिसा व कंबालपेठा येथे घरून दारूविक्री करीत असल्याची माहिती महिलांना मिळताच महिलांनी सकाळपासून शोधमोहीम राबविली. सदर मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. या अवैध विक्रेत्यांकडून गावठी दारू व दारू ठेवेले साहित्य जप्त केले. यासंदर्भात पोलिसांनाही माहिती दिली.