महिला बालकल्याण, पशुसंवर्धन विभाग मागे
By Admin | Updated: February 19, 2015 01:35 IST2015-02-19T01:35:11+5:302015-02-19T01:35:11+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी १ एप्रिल ते डिसेंबर २०१४ अखरेपर्यंत या ९ महिन्याच्या कालावधीत हस्तातरण अभिकरण जिल्हा निधी व १३ वने ...

महिला बालकल्याण, पशुसंवर्धन विभाग मागे
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी १ एप्रिल ते डिसेंबर २०१४ अखरेपर्यंत या ९ महिन्याच्या कालावधीत हस्तातरण अभिकरण जिल्हा निधी व १३ वने योजनेतून सरासरी ४० टक्के निधी खर्च केला आहे. निधी खर्चात महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभाग पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
हस्तांतरण योजनेंतर्गत जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाला २०१४ च्या डिसेंबर अखेरपर्यंत ५६२ लाख रूपयांची तरतूद होती. या विभागाने २०१४ च्या नोव्हेंबर अखेरीसपर्यंत ६२.१० लाखांचा तर डिसेंबर महिन्यात १.२९ लाख रूपये खर्च केले. २०१४ च्या डिसेंबर अखेरपर्यंत महिला व बालकल्याण विभागाने एकूण ६३.३९ रूपये खर्च केला असून या खर्चाची टक्केवारी ११.२८ आहे.
पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरण योजनेअंतर्गत २०१४ च्या डिसेंबर अखेरपर्यंत १२१६ लाख रूपयांची तरतूद होती. या विभागाने नोव्हेंबर अखेरपर्यंत ४६०.२२ लाख रूपये तर या विभागाचा डिसेंबर अखेरपर्यंतचा एकूण खर्च ५१४.५८ आहे. खर्चाची टक्केवारी ४२.३२ आहे.
जिल्हा निधीतून डिसेंबर २०१४ अखेर पशुसंवर्धन विभागाला १०.५५ लाख रूपयांची तरतूद मंजूर करण्यात आली. या विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत १ लाख रूपये खर्च केले. या खर्चाची टक्केवारी ९.४८ आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे ५.६० रूपयांची मंजूर तरतूद होती. मात्र या विभागाच्या खर्चाची टक्केवारी शून्य आहे.
वन महसूल योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाला २०१४ च्या डिसेंबर अखेरला ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. या विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत ७.५० लाख रूपये खर्च केले असून खर्चाची टक्केवारी २५ आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे डिसेंबर अखेरपर्यंत १३० लाख रूपयांची तरतूद होती. खर्चाची टक्केवारी शून्य आहे. (प्रतिनिधी)