शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- अम्ब्रीशराव

By admin | Updated: October 13, 2016 02:39 IST

अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे विश्वश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज यांच्यावर अहेरी इस्टेटच्या नागरिकांनी

अहेरीतील दसरा महोत्सव : १५ हजारांवर नागरिकांची उपस्थितीअहेरी : अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे विश्वश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज यांच्यावर अहेरी इस्टेटच्या नागरिकांनी जे प्रेम केले आणि जो विश्वास टाकला, तसाच विश्वास माझ्यावरही नागरिकांनी टाकला आहे. नागरिकांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली.मंगळवारी अहेरी येथील राजमहल परिसरात आयोजित दसरा महोत्सवात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी राजमाता रूखमिनीदेवी, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणरावबाबा व राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव म्हणाले, नागरिकांमुळेच मी मंत्री पदावर पोहोचलो आणि विकासाची कामे सुरू आहेत. मागील दोन वर्षांच्या अनुभवातून मी बरेच काही शिकलो आहे. पुढील तीन वर्षात जनतेसाठी विकासकामे करायची आहेत. सूरजागड लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात व्हावा, यासाठी मी कटीबद्ध असून सदर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाबाबत विरोधक जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवित आहे. युवकांनी फक्त वॉटस्अ‍ॅप, फेजबुकपर्यंत सिमित न राहता, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. चांगले शिक्षण घेऊन मोठे प्रशासकीय अधिकारी होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करावी, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. अहेरीच्या आत्राम परिवाराचा दसरा देशात प्रसिद्ध असून आपल्या या संस्कृतीचे जतन आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनता भोेळी आहे, मात्र विरोधक त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना भूलथापा देतात. मात्र मी असे होऊ देणार नाही, मी सदैव जनतेच्या पाठीशी राहणार, असे आश्वासन अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.सदर दसरा महोत्सवाला १५ हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. दरम्यान पारंपरिक आदिवासी रेला नृत्य सादर करण्यात आले. दसरा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नाविसं, भाजप कार्यकर्ते, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनिल कत्रोेजवार यांनी केले. (प्रतिनिधी)