भरधाव दुचाकी वाहनधारकांना आवर कोण घालणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST2021-07-12T04:23:26+5:302021-07-12T04:23:26+5:30
दुचाकी वाहनधारकांना कुणाचीही भीती नसल्याने बिनधास्तपणे दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवितात. काही दिवसांपूर्वी आलापल्ली मार्गाने भरधाव येणाऱ्या दुचाकीने समोरील दुचाकीला ...

भरधाव दुचाकी वाहनधारकांना आवर कोण घालणार?
दुचाकी वाहनधारकांना कुणाचीही भीती नसल्याने बिनधास्तपणे दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवितात. काही दिवसांपूर्वी आलापल्ली मार्गाने भरधाव येणाऱ्या दुचाकीने समोरील दुचाकीला धडक दिली. सुदैवाने यात हानी झाली नाही. पंधरा दिवसांपूर्वी चामोर्शीवरून येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकी वाहन व कारचा अपघात झाला होता. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले होते. सायंकाळी तर दुचाकी वाहने भरधाव वेगाने जात असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या दुचाकी वाहनधारकांवर आवर घालण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. या अगोदर आंबेडकर चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूक शिपाई राहत होते. रात्री ९ वाजेपर्यंत हे वाहतूक शिपाई राहत होते. तेव्हा दुचाकी वाहनधारकांना चाप बसलेला होता. काहींवर दंड आकारला गेला होता. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांवर चांगलीच धडकी भरलेली होती.