शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

वजन काट्यासाठी पैसा येतो कोठून?

By admin | Updated: June 25, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील बहुतांशी अंगणवाड्यामध्ये जुने इलेक्ट्रॉनिक वजन काटे आहेत.

मानधनासाठी पैसा नाही : दहिवडे यांचा सवाल
धानोरा : जिल्ह्यातील बहुतांशी अंगणवाड्यामध्ये जुने इलेक्ट्रॉनिक वजन काटे आहेत. सदर वजन काटे अंगणवाड्यांमध्ये धूळखात पडले आहे. असे असताना शासनाने तब्बल २५ कोटी रूपये खर्च करून नवे वजन काटे अंगणवाडीसाठी खरेदी केले आहे. वजन काटे खरेदी करण्यासाठी शासनाकडे पैसा आहे. मात्र अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना नियमित मानधन देण्यासाठी शासनाकडे पैसा नाही. वजन काटे खरेदी करण्यासाठी शासनाला पैसा कोठून येतो, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी उपस्थित केला.
धानोरा तालुक्यातील गट्टा येथे सोमवारी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा कार्यकर्त्या मंदा शेडमाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रा. दहिवडे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मानधन वाढ लागू होईपर्यंत संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात लढा सुरू राहील, असेही दहिवडे यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक नभिता मडावी यांनी केले तर आभार पुण्यशीला मेश्राम यांनी मानले. यावेळी पुष्पा गेडाम, जानकी गावंडे, कल्पना भोसले आदींसह गट्टा सर्कलमधील बहुसंख्य अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)