मुस्लिमांवरच अन्याय का?
By Admin | Updated: January 22, 2015 01:09 IST2015-01-22T01:09:24+5:302015-01-22T01:09:24+5:30
मराठ्यांच्या त्यांचे आरक्षण पूर्ववत देण्यात आले. मग मुस्लिमांवरच अन्याय का, असा सवाल उपस्थित करून आघाडी सरकारने जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण

मुस्लिमांवरच अन्याय का?
गडचिरोली : मराठ्यांच्या त्यांचे आरक्षण पूर्ववत देण्यात आले. मग मुस्लिमांवरच अन्याय का, असा सवाल उपस्थित करून आघाडी सरकारने जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण पूर्ववत लागू करावे, अशी मागणी मुस्लिम हक्क संघर्ष समितीने आंदोलनादरम्यान केली.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाकरिता धरणे आंदोलन बुधवारी करण्यात आले. तसेच अशाच प्रकारचे आंदोलन देसाईगंज व अहेरी येथेही करण्यात आले. सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु नवीन राज्य सरकारने हे आरक्षण रद्द करुन केवळ मराठ्यांच्या आरक्षणाचे विधेयक पारित केले. हा मुस्लिमांवर अन्याय आहे. १९४७ च्या सुमारास ४५ टक्के मुस्लिम नागरिक नोकरीवर होते. मग, आता ही टक्केवारी दोनवर का आली, असा सवाल मान्यवरांनी यावेळी उपस्थित केला. सरकारने मुस्लिमांशी भेदभाव न करता त्यांचे पाच टक्के आरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गडचिरोलीच्या आंदोलनात अॅड. रफिक शेख, मुस्ताक कुरेशी, फिरोज खाँ. पठाण, मुस्लिम वेल्फेअर कमिटीचे अध्यक्ष अखिल शेख, बाशिद शेख, एजाज शेख, सय्यद, जब्बार शेख, फरहान पठाण, सय्यद इम्रान, आदिल पठाण, रमजान शेख, फारूख शेख, फारूख अल्ली, शबीर खॉ. पठाण, मुन्ना शेख, अजमल हाशमी, हाफीज शरीफ, मौलाना रियाजुद्दीन, मौलाना मुकबिर रज्जा, शबीर शेख, अर्शद शेख, शानू पटेल यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनात अल्पसंख्याक फेडरेशन, मुस्लिम हक्क संघर्ष समिती व मुस्लिम वेल्फेअर कमिटी या तीन संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषद, मुस्लिम एकता मंच, मुस्लिम बहउद्देशीय विकास मंच, मेस्को ओर लाईफ फाऊंडेशन, मुस्लिम बॅकवर्ड, बहुउद्देशीय संस्था, मुस्लिम कृती समिती, गाजी-ए-हिंद सोशल फोरम, मौलाना अब्दुल कलाम आझाद सोशल फोरम आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
देसाईगंज शहरातील मदिना मस्जिद मैदानावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी सय्यद आबिद अल्ली, नाशिर हाशमी, जमाल गन्नी शेख, शहजाद शेख आदी उपस्थित होते.
अहेरी येथेही मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जमीर हकीम यांनी केले.
या आंदोलनात हाजी रमजानभाई, हाजी सैयद अनवर अली, सैयद आबीद अली, महेबूब अली, मनसूर अल्ली, पठाण, मुस्ताक हकीम, चांद खॉन पठाण, इरफान खॉन, जाफर अल्ली, इरफान शेख, हनीफभाई, अब्दूल रज्जाक कुरेशी, मोईनुद्दीन हकीम, अफसर खान शेख, मो. रशीद, निसार सैयद, जावेद अली, इस्फाक शेख, प्रा. शेख, बक्कर शेख, हुसेन खान पठाण, तसदीक हुसेन, रियाज कुरेशी यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)