बँक खात्यातून समृद्धीचा मार्ग

By Admin | Updated: January 14, 2015 23:09 IST2015-01-14T23:09:27+5:302015-01-14T23:09:27+5:30

केंद्र सरकारने जन-धन योजना लागू करून प्रत्येक व्यक्तिचे बँक खाते उघडण्यास सुरूवात केली आहे. या योजनेला गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक जिल्हा सहकारी बँकेने महिलांच्या खात्याशी

Way of prosperity from bank account | बँक खात्यातून समृद्धीचा मार्ग

बँक खात्यातून समृद्धीचा मार्ग

दुर्गम भागात महिलांचा प्रचंड प्रतिसाद : जनधन योजनेत निघाले खाते
गडचिरोली : केंद्र सरकारने जन-धन योजना लागू करून प्रत्येक व्यक्तिचे बँक खाते उघडण्यास सुरूवात केली आहे. या योजनेला गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक जिल्हा सहकारी बँकेने महिलांच्या खात्याशी जोडून समृद्धी बचतीचा नवा मार्ग दाखवून दिला आहे. जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात जन-धन योजनेसोबत ही योजना जोडण्यात आल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे महिलांचे ७४० तर सिरोंचा येथे ७२३, कोरची तालुक्याच्या बेतकाठी येथे २४७, तर कोरची येथे ३९७, भामरागड येथे ७९४, एटापल्ली येथे १४२०, कसनसूर येथे ५६९, धानोरा तालुक्याच्या कारवाफा येथे २२६, रांगी येथे ४७४ खाते उघडण्यात आले आहे. या खात्यांवर महिला मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करीत असल्याने महिलांसाठी जन-धन योजना समृद्धीचा नवा मार्ग घेऊन आली आहे. महिलांची आर्थिक उलाढाल पाहून त्यांना या उलाढालीवर उद्योगांसाठी तसेच गरजेसाठी कर्जही उपलब्ध करून देण्याचे काम गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या करीत आहे. जन-धन योजनेला गडचिरोली जिल्ह्यात समृद्धी बचत योजनेची जोड देण्यात आल्याने आता महिला बचतीच्या नव्या दिशेने वाटचाल करीत आहे. पूर्वी महिला बचतगट याकामी काम करीत होते. परंतु महिला बचतगट गटाबाहेर कर्ज देतात, अशा तक्रारी आल्या. त्यामुळे आता व्यक्तिगत स्वरूपात महिलांना कर्ज पुरवठा या माध्यमातून होणार आहे.

Web Title: Way of prosperity from bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.