रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:39+5:30

शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल.

The water of the reservoir was released on the day of Regadi | रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

रोवणी खोळंबल्याने सोडले रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील रोवणी खोळंबल्याने रेगडीच्या दिना जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी तालुक्यातील धान रोवणी खोळंबली आहे. परिसरातील शेतकरी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिना धरणाचे पाणी सोडण्याबाबत वारंवार विचारणा करीत होते. शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मिश्रा, चामोर्शी तालुका पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी ए. एस. घोलपे, अभियंता विकास दुधबावरे, एस. टी. बोदलकर, ए. ए. गेडाम, कालवे सल्लागार समितीचे त्रियुगी दुबे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, राजेश्वर चुधरी, भास्कर बुरे, काशिनाथ बुरांडे, श्रावण दुधबावरे, नानाजी बुरांडे उपस्थित होते.
समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता मेश्राम आणि आमदार होळी यांनी गेट व्हील फिरवून पाटाकरिता पाणी सोडले. 
शेतकऱ्यांना पुढील पाच दिवस अविरत पाणी पुरवल्या जाईल. सलोख्याने पाणी वाटप करून घ्यावे, असे आवाहन  यावेळी केले. दिना जलाशयात ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

 

Web Title: The water of the reservoir was released on the day of Regadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.