१३० गावांत जलसंकट ! ६ कोटींचा पाणी आराखडा तयार

By दिलीप दहेलकर | Updated: March 4, 2025 15:33 IST2025-03-04T15:33:11+5:302025-03-04T15:33:51+5:30

Gadchiroli : ४० नळ योजनांची होणार दुरूस्ती

Water crisis in 130 villages! 6 crore water plan ready | १३० गावांत जलसंकट ! ६ कोटींचा पाणी आराखडा तयार

Water crisis in 130 villages! 6 crore water plan ready

दिलीप दहेलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्याचा ५२ गावे आणि ७८ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार केला असून यातील कामे पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. टप्पा २ च्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १३० गावांमध्ये पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी २२ लाखांच्या उपाययोजना करण्यात येणार आहे.


जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.


पं.स. कडून मागविली जाते माहिती
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार केला. याला तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून याला लवकरच मान्यता मिळणार आहे. पाणी सुविधा कामांची माहिती पंचायत समितीकडून मागवावी लागते. पाणी सुविधेच्या कामांना ग्रामसभांची मंजुरी आवश्यक ठरते.


विहिरींचे अंदाजपत्रक तयार
नव्याने बांधण्यात येणाऱ्या विंधन विहिरींचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाच्या तंत्रज्ञांनी तयार केले असून हे अंदाजपत्रक अंतिम झाले असल्याची माहिती आहे.


एप्रिलपासून कामे सुरू होणार

  • जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत उपाययोजना केल्या जातात. टप्पा क्र. २ हा जानेवारी ते मार्च या कालावधीसाठीचा आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी टप्पा क्र. ३ चा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
  • या आराखड्याला मार्च महिन्याच्या अखेरीस मान्यता मिळणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. टप्पा क्र. २ च्या आराखड्यातील कामांना एप्रिलच्या सुरुवाती प्रारंभ होईल. 


अशी होतील कामे...

  • पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार यामध्ये विंधन विहिरी ११२, विहीर खोलीकरण ७तसेच लघू व मोठ्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीची ४० अशी एकूण १५९ कामे होणार आहेत.
  • यातून संबंधित गावांतील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न होईल.


१५९ ११२ ठिकाणी नवीन विंधन विहिरीचे नियोजन
कामे या आराखड्यात समाविष्ट आहेत. यात दहा तालुक्यांच्या १३० गावांत उपाययोजना केल्या जातील. भामरागड व एटापल्ली तालुक्याचा या आराखड्यात समावेश नाही.

Web Title: Water crisis in 130 villages! 6 crore water plan ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.