शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या हमीभावाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 3, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत.

देसाईगंज : जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याची तसेच धानाला हमी भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात धानपीक प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. अनेक शेतकरी खरीप धानपिकाची लागवड करतात. काही शेतकरी उन्हाळी धानपिक लावगड करतात. मात्र धानपिक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा असते. हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी चळवळ उभारतात. मात्र या चळवळीला पाठबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. धान निघाल्यानंतर अनेक गावांमध्ये खासगी व्यापारी आपला धंदा थाटतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांच्या घश्यात जात असते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु अनेक गावांना धान खरेदी केंद्राची अद्यापही प्रतीक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांना हमीभाव मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्ता भत्ता दिला जातो. मात्र शेतकऱ्यांना हमीभावही दिला जात नाही. संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भत्ता अनेक कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी लढावे लागते. अशी परिस्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे. शेतकऱ्यांची दैनावस्था झाल्याने त्यांना सरकारचे तसेच लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब
जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र सिरोंचा तालुक्यातील तीन आष्टी परिसरातील, आरमोरी तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल किंमतीत विकावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.