शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलातून काढावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:39 IST

गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देतिमरमवासीयांना त्रास : मागील चार वर्षांपासून पावसाळ्यात आवागमनास अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या तिमरम येथे मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना एकफुट चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे या त्रासापासून नागरिकांची मुक्तता केव्हा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील गाव म्हणून तिमरमची ओळख आहे. गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांनी यासाठी वारंवार स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप तिमरमवासीयांनी केला आहे. सध्या गावातील नागरिकांना आवागमन करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. एक ते दीडफुट चिखल रस्त्यावर निर्माण झाला आहे. येथूनच नागरिक शेताकडे जात असतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येथील रस्त्यावर खडीकरण करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.सरपंच म्हणतात, रोहयोतून होणार कामतिमरम येथील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. याच मार्गावर लोकवस्तीही आहे. शिवाय नागरिक येथूनच शेताकडे आवागमन करतात. या रस्त्याचे खडीकरण तसेच मजबुतीकरणाबाबत सरपंच महेश मडावी यांना विचारणा केली असता, सदर रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून केले जाणार आहे, असे सांगितले. परंतु मागील चार ते पाच वर्षांपासून या मार्गावर चिखल निर्माण होत असल्याने नागरिकांना ही समस्या असय्य झाली आहे. त्यामुळे नागरिकही त्रासले आहेत. त्यांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक