अहेरीत निघाला विराट मोर्चा
By Admin | Updated: August 16, 2014 23:28 IST2014-08-16T23:28:12+5:302014-08-16T23:28:12+5:30
अनुसूचित जमातीत इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज अहेरी

अहेरीत निघाला विराट मोर्चा
पट्टे वाटप करण्याची मागणी : हजारो आदिवासी बांधव उपस्थित
अहेरी : अनुसूचित जमातीत इतर कुठल्याही समाजाला समाविष्ट करू नये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करण्यात यावे, अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज अहेरी येथे आदिवासी कृती समितीच्यावतीने माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात हजारो आदिवासींचा मोर्चा काढण्यात आला.
एस. बी. महाविद्यालयाच्या मैदानावरून आदिवासी परंपरागत ढोलताशाच्या निनादात हा मोर्चा प्रारंभ झाला. दीड तास शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा चालत जाऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, युवा नेते ऋतूराज हलगेकर, क्रिष्णरावबाबा, पं. स. सदस्य रामेश्वर आत्राम, मुतन्ना दोंतूलवार, मुतन्ना पेंदाम, आशाताई पोहणेकर, पुष्पा अलोणे, संजय चरडुके, यशवंत दोंतुलवार, प्रभाकर येनगंटीवार, नामदेव आत्राम, अहेरीचे सरपंच गंगाराम कोडापे, विलास सिडाम, सुरेंद्र अलोणे, नागेश मडावी, सरपंच सतीश आत्राम, जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, जि.प. सदस्य लैजा चालुरकर, लक्ष्मी कुळमेथे, उषा आत्राम, मिनाक्षी सडमेक, प्रशांत आर्इंचवार, दौलत दहागावकर, अरूण बेझलवार, मल्लिकार्जुन आकुला, अॅड. राजेंद्र मेंगनवार, डॉ. निखील इजतदार, अॅड. कोंडागुर्ला, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेश हलामी, बबलू सडमेक यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार किशोर कुणालपवार आदी उपस्थित होते. मोर्चानंतर जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत अनुसूचित जमातीत धनगरांना आरक्षण देण्यात येऊ नये, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. मागील पाच वर्षांपासून बीपीएल व वनजमिनीवरील अतिक्रमणाचा विषय प्रलंबित आहे. मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जाऊन निवेदनाबद्दलची माहिती दिली. या जाहीर सभेला मेहबूब अली, ऋषी पोरतेट व बबलू सडमेक यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)