लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांनी मंगळवार दि.२८ जुलैपासून पुकारलेल्या शहीद सप्ताहाला उघड विरोध करत सावरगाव येथील नागरिकांनी नक्षलींनी लावलेल्या बॅनरची होळी केली. यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिक सावरगावात जमले होते.धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सावरगाव ते मुरूमगाव मार्गावरील त्रिशुल पॉईंटवर, तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान मंगळवारी परिसरातील नागरिकांनी सावरगाव येथे एकत्रित जमून नक्षली बंद न पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ‘नक्षलवादी मुर्दाबाद, नक्षल भगाओ-आदिवासी बचाओ’ असा नारा देत गावकऱ्यांनी नक्षली बॅनरची होळी केली. नक्षलवाद्यांनी गेल्या २५ वर्षांपासून शहीद सप्ताह पाळून कोणता विकास केला? सामान्य नागरिकांना नक्षल्यांच्या बंद व हिंसक कृत्याची गरज नसून विकासाची आवश्यकता आहे आणि तो लोकशाही मार्गानेच साध्य होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. निष्पाप आदिवासींची हत्या केल्याबद्दल नक्षलवादी कधी सप्ताह पाळणार? असा सवालही त्यांनी केला.पोलिसांच्या गावभेटीतून विश्वासाचे वातावरणनक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील पोलीस ठाणे, पोलीस मदत केद्रातील प्रभारी अधिकाºयांनी दुर्गम व अतिदुर्गम भागातील गावात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी पोलीस दलावर विश्वास दाखवत नक्षलवाद्यांना विरोध करणार असल्याचे सांगितले.सावगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी बऱ्याच वर्षांपासून ग्यारापत्ती ते कटेझरी आणि कटेझरी ते मुरूमगाव मार्ग पूर्णत्वास नेल्याबद्दल पोलीस दल व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. आमचा नक्षलवाद्यांना विरोध असून आम्ही विकासासाठी झटणाºया प्रशासनासोबत असल्याची ग्वाही दिली.
ग्रामस्थांचा ‘नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ’चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST
धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सावरगाव ते मुरूमगाव मार्गावरील त्रिशुल पॉईंटवर, तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान मंगळवारी परिसरातील नागरिकांनी सावरगाव येथे एकत्रित जमून नक्षली बंद न पाळण्याचा निर्धार व्यक्त केला.
ग्रामस्थांचा ‘नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ’चा नारा
ठळक मुद्देसावरगावात बॅनर जाळले : नक्षल सप्ताहाला विरोध दर्शवत बंद न पाळण्याचा निर्धार