महात्मा गांधी महाविद्यालयात ग्रामजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:29+5:302021-05-01T04:34:29+5:30
याप्रसंगी मनोहरभाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी नामदेवराव सोरते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सूतमाला व पुष्पमाला अर्पण करून ...

महात्मा गांधी महाविद्यालयात ग्रामजयंती साजरी
याप्रसंगी मनोहरभाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी नामदेवराव सोरते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सूतमाला व पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच महाविद्यालय परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. वामनराव वनमाळी व स्व. किशोर वनमाळी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दीपक बेहरे, हरिश्चंद्रजी बोंदरे, मयूर वनमाळी यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. ग्रामजयंतीची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. दरम्यान, महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर स्व. हिरालाल मगरे व कनिष्ठ महाविद्यालयातील स्व. मिलिंदकुमार दर्वे यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी कार्यक्रमास मनोहरभाई शिक्षण मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, सदस्य दीपक बेहरे, सहसचिव हरिश्चंद्र बोंदरे, नामदेवराव सोरते, मयूर वनमाळी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. किशोर वासुर्के, डॉ. विजय रैवतकर तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विजय रैवतकर यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले.