गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 18:01 IST2019-05-09T18:00:44+5:302019-05-09T18:01:12+5:30
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत रस्त्याचे काम सुरु होते.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ
एटापल्ली (गडचिरोली) : गेल्या आठवड्यात जाळपोळ आणि भूसुरूंग स्फोटासह दोन नागरिकांची हत्या घडवून हादरवून सोडणा-या नक्षलवाद्यांनी बुधवारी (दि.८) पुन्हा एटापल्ली तालुक्यात वाहनांची जाळपोळ केली. कसनसूर पोलीस ठाण्यांतर्गत कारका गावालगत रस्त्याच्या कामावरील पाण्याचा टँकर आणि मिक्सर मशिन पेटवून दहशत निर्माण केली आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत रस्त्याचे काम सुरु होते. महिनाभरापूर्वीच हे काम संपले. परंतु तेथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाण्याचा टँकर ठेवलेला होता. तसेच साधी मिक्सर मशिनही होती. बुधवारी दुपारी नक्षल्यांनी पाण्याचा टँकर व मिक्सर मशिनला आग लावली. यात नेमके किती नुकसान झाले याची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही.
मोठ्या हिंसक कारवाया घडविण्यात यश आल्यानंतर नक्षलवाद्यांची हिंमत वाढली असल्याचे दिसून येत आहे.