कैद्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:05 IST2019-05-31T00:04:45+5:302019-05-31T00:05:18+5:30
येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना भाजीपाला लागवड व व्यवस्थापनचे १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी करण्यात आला.

कैद्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना भाजीपाला लागवड व व्यवस्थापनचे १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद भोसले, संवर्ग विकास अधिकारी शालिक पडघन, तुरूंग निरीक्षक निमगडे, कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे डॉ.विक्रम कदम, डॉ.पुष्पक बोथीकर, आरसेटीचे संचालक शून्यशहा टेकाम, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पी.डी.काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
२० ते २९ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले. बँक आॅफ इंडियाचे एरिया प्रबंधक विजयसिंह बैस यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. भाजीपाल्याची लागवड कशी करावी, उत्तम दर्जाचा भाजीपाला पिकविण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच बाजारपेठेबाबतही माहिती देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमादरम्यान बीडीओ शालिक पडघन यांनी मार्गदर्शन करताना कैद्यांनी भूतकाळात झालेल्या चुकांना विसरून जाऊन पुढे जावे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेतून रोजगार उपलब्ध करावा, असे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.