शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वेदांत मांडवे जिल्ह्यात पहिला

By admin | Updated: May 28, 2015 01:02 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) चा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) चा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा वेदांत दामोधर मांडवे हा ९२.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. याच महाविद्यालयातून पियुष किरंगे हा ९०.९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून दुसरा आला आहे. तर कला शाखेतून शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचा महेश रविंद्र भांडेकर ८४.१५ टक्के गुण घेऊन कला शाखेतून जिल्ह्यात पहिला आला आहे.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.६५ टक्के, कला शाखेचा निकाल ८४.८५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.९१ टक्के, किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ८६.६२ टक्के लागला आहे.
निकाल वाढला - शिक्षणाधिकारी
गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल यंदा चार टक्क्याहून अधिक वाढला आहे. या निकालात गुणवत्ता वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या वर्षभर शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालय व शाळांमध्ये दहावी, बारावीचा निकाल वाढविण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. कॉपीमुक्त परीक्षा हा ही उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर यंदाच्या परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली आहे. गतवर्षी १२ वीचा निकाल ८४.३८ टक्के होता. यंदा तो ८८.०४ टक्के झाला आहे. ही टक्केवारी ३.६६ टक्क्यांनी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी (माध्यामिक) उल्हास नरड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
नागपूर विभागात गडचिरोलीचा निकाल सर्वात कमी
नागपूर बोर्डात गडचिरोली जिल्हयाचा निकाल सर्वांत कमी ८८. ४ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल वाढला असला तरी नागपूर शिक्षण मंडळांतर्गत येत असलेल्या जिल्ह्याच्या तुलनेत हा निकाल सगळ्या शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. त्यांनी तो टिकवून ठेवला नाही. त्यामुळे यंदा निकालात घसरण झाली, असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील आश्रमशाळांचे निकाल समाधानकारक नसल्याचे दिसून येते.
निकालात मुली अव्वल: जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के
मुलींचा निकाल ८७ टक्के

गडचिरोली जिल्ह्यातून सात हजार ४१ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच हजार ८०० नऊ मुले उत्तीर्ण झालेत. मुलांची टक्केवारी ८२.५० आहे. जिल्ह्यातून सहा हजार १५६ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच हजार ८०९ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ८७ टक्के आहे.
खासगीरित्या गडचिरोली जिल्ह्यातून ५३ मुले व ५८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ४० मुले व २७ मुली उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ७३.६३ आहे.
बाह्यविद्यार्थी म्हणून १५ मुले व ११ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी कुणीही उत्तीर्ण झाले नाही.
श्रेणी सुधार योजनेंतर्गत १५ मुले व तीन मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ मुले व दोन मुली उत्तीर्ण झालेत. त्यांचा निकाल ७७.७८ टक्के लागला आहे.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या हेमलकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही १०० टक्के निकाल दिला आहे.