राणी दुर्गावती विद्यालयात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST2021-01-08T05:57:08+5:302021-01-08T05:57:08+5:30

गडचिराेली : स्थानिक राणी दुर्गावती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात बालिका दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त ...

Various competitions at Rani Durgavati Vidyalaya | राणी दुर्गावती विद्यालयात विविध स्पर्धा

राणी दुर्गावती विद्यालयात विविध स्पर्धा

गडचिराेली : स्थानिक राणी दुर्गावती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात बालिका दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून प्रथम क्रमांक मानसी रायपुरे तर आठवी ते हावीच्या गटात प्रथम क्रमांक मनीषा मेडीवार, द्वितीय क्रमांक सूरज डाेईजड तर तृतीय क्रमांक सलाेनी गेडाम हिने पटकाविला. निबंध स्पर्धेत प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक मानसी रायपुरे, द्वितीय क्रमांक वैष्णवी कमळापूरवार तर तृतीय क्रमांक अक्षरा बारसागडे हिने पटकाविला. माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक माेहिनी येसनसुरे, द्वितीय क्रमांक सलाेनी गेडाम, तृतीय क्रमांक संपदा गेडाम हिने पटकाविला. कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक हेमाक्षी खाेब्रागडे हिने पटकाविला. स्पर्धेचे परीक्षण सुनीता चुधरी हिने केले. विजेत्यांना प्राचार्य वैशाली मडावी व पर्यवेक्षक बरय्या यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष घनश्याम मडावी व शिक्षकांनी काैतुक केले.

Web Title: Various competitions at Rani Durgavati Vidyalaya