वऱ्हाडाचे वाहन झाडावर आदळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:10 IST2018-05-10T00:10:14+5:302018-05-10T00:10:14+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरचे लग्न वºहाड घेऊन गडचिरोलीकडे निघालेला भरधाव मिनी ट्रक झाडावर आदळला. यात एक महिला दगावली तर ४६ लोक जखमी झाले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.

वऱ्हाडाचे वाहन झाडावर आदळले
लोकमत न्यूज नेटवर्क
राजाराम खांदला : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरचे लग्न वºहाड घेऊन गडचिरोलीकडे निघालेला भरधाव मिनी ट्रक झाडावर आदळला. यात एक महिला दगावली तर ४६ लोक जखमी झाले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, लग्नाचे वºहाड घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रक चालकाचे सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील मोसम गावाजवळ नियंत्रण सुटल्याने तो ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळला. यात ट्रकमधील ४७ प्रवासी जखमी झाली. त्यांना तत्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी ताई आत्राम (५५) रा. झिंगानूर ही महिला रुग्णालयात उपाचारादरम्यान दगावली. गंभीर जखमी असलेल्या ११ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. त्यात मासी आत्राम (६०), विद्या मडावी (४२), रामबाई आत्राम (३५), लिंगा आत्राम (४०), दुर्गा मडावी (६०), विजया गावडे (३०), पेंटी मडावी (५०), सन्नी मडावी (२५), वेल्ली सिडाम (३५), संतोष मडावी (२५), तारी आत्राम (५५) यांचा समावेश आहे. उर्वरित जखमींवर अहेरीत उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दिवसभरात रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी भाजप आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह आविसंचे अशोक येलमुले, पवन दोंतुलवार, प्रसाद मद्दीवार, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, शंकर सिडाम, के.एम.वराघिनटवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.गंम्भीर जखमीना
पुढील उपचारासाठी चंद्रपुरला हलवन्यात आले. डॉ.कन्ना मडावी यांना या घटनेची माहिती मिळताच डॉ.उमाटे तसेच त्यांचे वैद्यकीय चमु उपचार करण्यासाठी सज्ज होते.