शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंग आचलच्या यशाने घाटी उजळली

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग. परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या भरवशावर शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या घाटी येथील आचल प्रदीप राऊत या....

उजव्या पायाने लिहिला पेपर : दहावीत ७७.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली
कुरखेडा : जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग. परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या भरवशावर शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या घाटी येथील आचल प्रदीप राऊत या विद्यार्थिनीने उजव्या पायाच्या बोटांनी दहावीच्या परीक्षेचा पेपर लिहून या परीक्षेत ७७.४० टक्के गुण मिळविले. तिच्या या अतुलनिय यशाने कुरखेडा तालुक्यातील घाटी हे गाव उजळून निघाले आहे. तिच्या या यशाची शाळेसह परिसरातील पंचक्रोशीतही मोठी चर्चा सध्या आहे.
घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयात शिकत असलेली आचल प्रदीप राऊत ही विद्यार्थिनी जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग असली तरी तिने या अपंगत्त्वाचा कधीही बाऊ केला नाही. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या भरवशावर केवळ शाळेत शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाच्या भरवशावर तिने अतुलनिय बुध्दीमत्तेच्या भरवशावर दहावीच्या परीक्षेत हे यश मिळविले आहे. शाळेत शिकविलेल्या अभ्यासाचीच उजळणी घरी येऊन करणे हा तिचा नित्यक्रम होता. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करणे व अभ्यास करताना वेळेचे कधीही भान न ठेवणे या भरवशावर आचलने हे यश मिळविले आहे. दहावीच्या परीक्षेत तिने उजव्या पायाने पेपर सोडवून ५०० पैकी ३८७ गुण घेतले व ती शाळेतून पहिली आली आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन न्यायाधीश होण्याची तिची इच्छा आहे. तिने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)