आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:40+5:30

४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, केवळ ६६ हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ १५ टक्केच आहे. काेराेनाची दुसरी लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे.

Vaccines will now be available at all centers every day | आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस

आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस

ठळक मुद्देआराेग्य विभागाचा निर्णय : जिल्ह्यातील ७२ केंद्रांवर पाेहाेचली लस

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय सुटी व रविवार वगळता सर्वच लसीकरण केंद्रांवर सर्वच दिवशी लस देण्याचा निर्णय आराेग्य विभागाने घेतला आहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात आली. 
४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, केवळ ६६ हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ १५ टक्केच आहे. काेराेनाची दुसरी लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेकांचा जीव जात आहे. अशा स्थितीत लसीकरणाची गती मात्र अतिशय मंद आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात ७० शासकीय व २ खासगी, अशी एकूण ७२ लसीकरण केंद्रे आहेत. यातील बहुतांश लसीकरण केंद्रे प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावर सुरू करण्यात आली आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावरचे लसीकरण केंद्र आठवड्यातून केवळ साेमवार, बुधवार व गुरुवार हे तीनच दिवस सुरू राहत हाेते. इतर दिवशी मात्र बंद राहत हाेते. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण हाेत नव्हते. ही बाब आराेग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर सर्वच केंद्रांवर शासकीय सुटी व रविवार वगळता दरराेज लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय आराेग्य विभागाने घेतला आहे. 
आराेग्य विभागाच्या या नवीन निर्णयामुळे लसीकरणाची गती वाढेल, अशी अपेक्षा आहे. 

१७ हजार लस शिल्लक
आठ दिवसांपूर्वी लसींचा साठा संपल्याने प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावरील काही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली हाेती. मात्र, आता सर्वच लसीकरण केंद्रांवर लस पाेहाेचविल्या आहेत. जिल्हाभरातील सर्वच केंद्रे आता सुरू झाली आहेत. जिल्ह्यात १७ हजार लस डोसचा साठा उपलब्ध आहे. पुन्हा आठ दिवसांत काही लस डोस उपलब्ध हाेणार आहेत. काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला तरी त्याचा जीव जात नाही. ही बाब अनेकांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकही आता लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढेली, अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: Vaccines will now be available at all centers every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.