धान शेतीत हिरवळीच्या खतांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:30+5:302021-07-26T04:33:30+5:30

भिवापूर येथे मार्गदर्शनप्रसंगी शेतकरी बंडू कुनघाडकर, संघपाल कुनघाडकर, राकेश गव्हारे, प्रकाश मेश्राम उपस्थित होते. कमी कालावधीत येणाऱ्या हिरवळीच्या वनस्पतींची ...

Use of green manure in paddy field | धान शेतीत हिरवळीच्या खतांचा वापर

धान शेतीत हिरवळीच्या खतांचा वापर

भिवापूर येथे मार्गदर्शनप्रसंगी शेतकरी बंडू कुनघाडकर, संघपाल कुनघाडकर, राकेश गव्हारे, प्रकाश मेश्राम उपस्थित होते.

कमी कालावधीत येणाऱ्या हिरवळीच्या वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. ही झाडे फुलोरा अवस्थेत आल्यानंतर, पाने, फांद्या व पडलेला पालापाचाेळा शेतात पसरवून चिखलणीदरम्यान गाडून घेतला जाताे. हिरवळीच्या खतांमध्ये ढेंचा (सिसबेना अक्युल्टा), साेनबाेरू (क्राेटालारिया ज्यंसी) आदी वनस्पतींसह चवळी (विगना कटजंग) बस्सीम गवत (ट्रायकाेफाेलियम ॲलेक्झांड्रम) सेनजी (मेलिओथस परविफलाेरा) यांचा समावेश हाेताे. खरीप हंगामात पाऊस पडल्यानंतर, हिरवळीच्या खतांच्या बिया बांध्यामध्ये पेरल्या जातात. या पिकाची लागवड करताना, विशेष मशागतीची आवश्यकता पडत नाही, तरी जमिनीची नांगरणी व वखरणी करावी, पेरणी करताना जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाची उगवण व वाढ जोमाने होते. पीक लागवडीसाठी स्फुरदयुक्त खते द्यावीत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय गंगावणे, प्रज्ज्वल जेनेकर, कार्तिक भेलावे आदी विद्यार्थी उपस्थित हाेते.

बाॅक्स

हिरवळीची खते गाडण्याची याेग्य वेळ

हिरवळीच्या खतांमुळे पीक जाेमात येते. त्यामुळे ही पिके याेग्य वेळी जमिनीत गाडणे आवश्यक आहे. ही पिके ६ ते ८ आठवड्यांत फुलोऱ्यावर येतात. तेव्हा चिखलणीच्या वेळी ती जमिनीत गाडावी. सोनबोरूसारखे पीक जमिनीत गाडल्याने नत्राचे स्थिरीकरण हाेते, तसेच धानाच्या उत्पन्नात १२ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ हाेऊ शकते.

बाॅक्स

हिरवळींच्या खताचे फायदे

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडून सूक्ष्म जीवजंतूची हालचाल वाढते. जमिनीचे आराेग्य व पाेत सुधारताे. जमिनीची धूप कमी हाेते. जमिनीची सच्छिद्रता वाढून पावसाचे पाणी जमिनीत अधिक मुरण्यास मदत हाेते. जमिनीत अन्नद्रव्ये साठवली जातात. जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते, तसेच स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व इतर अन्नद्रव्ये पिकांना काही प्रमाणात मिळतात आदी फायदे हिरवळींच्या खताचे आहेत.

Web Title: Use of green manure in paddy field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.