शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:05 AM

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण व कौशल्यांना वाव मिळण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा महोत्सवातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.

ठळक मुद्दे कुलगुरूंचे प्रतिपादन : शिवाजी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे उद्घाटन थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण व कौशल्यांना वाव मिळण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा महोत्सवातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक शिवाजी महाविद्यालयात मंगळवारी आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष के. के. भोयर, सहसचिव डी. एन. चापले, विद्यापीठ प्रतिनिधी आशिष स्वामी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी रमेश पेरगु, प्राचार्य डॉ. बी. एस. चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बी. एस. चिकटे यांनी प्रास्ताविकेततून दोन दिवशीय युवा महोत्सवामध्ये होणारे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांविषयी सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी अनिल म्हशाखेत्री, के. के. भोयर, डी. एन. चापले यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रेवनदास शेडमाके यांनी केले तर आभार प्रा. के. आर. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ प्राध्यापक, एमसीव्हीसी विभागाचे प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, अंशकालीन प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.