शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

गडचिरोली जिल्ह्यात कुरमा प्रथा निर्मूलनासाठी ‘उडान’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:05 IST

आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जागृती आणून कुरमा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘उडान’ हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे.

ठळक मुद्देशाळकरी मुली-महिलांचे प्रबोधन : जिल्हाभरातील शिक्षिकांसह ‘उमेद’च्या कर्मचाऱ्यांचा राहणार सहभाग

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जागृती आणून कुरमा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘उडान’ हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. सद्यस्थितीत गावागावात असलेल्या कुरमाघरांना विरोध न करता पुढील पिढीत या प्रथेबद्दल प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आदीम काळापासून आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिला व किशोरवयीन मुलींना कुरमाघर गावाच्या एका कडेला असलेल्या विशिष्ट झोपडीत वास्तव्य करावे लागते. त्या ठिकाणी वीज, पाण्यासह कोणत्याही सुविधा नसतात. यामुळे अस्वच्छता राहून महिला विविध लैंगिक आजारांचा सामना करावा लागतो. गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग किंवा आजीवन वंधत्व यासारखेही आजार त्यांना जडतात. केंद्र शासनाने या जिल्ह्याचा आरोग्य व पोषण बाब निर्देशांक सुधारण्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. त्याअंतर्गत ‘मावा गडचिरोली’मधून जिल्ह्याच्या विकासाबाबत विविध उपाय व सल्ले नागरिकांमधून मागविले होते. त्यात कुरमाघराबद्दल अनेकांनी उपाय सुचविले. ही परंपरा एकाएकी बंद करण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी नागरिक ते सहन करणार नाही. त्यामुळे जनजागृतीतून पुढील पिढीचे मतपरिवर्तन करण्यासाठी ‘उडान’ हा कार्यक्रम आरोग्य व शिक्षण विभागाच्या सहकार्याने राबविला जात आहे.एकूण सहा टप्प्यात राबविल्या जाणाºया या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील तीन शाळांमधील विद्यार्थिनीमधून कुरमा प्रथेबद्दल सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर यापूर्वी असा प्रकल्प राबविलेल्या सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यातून राज्यस्तरीत प्रशिक्षकांना बोलवून युनिसेफच्या मदतीने त्यांनी गेल्या २२ ते २६ आॅगस्टदरम्यान पाच दिवस सर्व तालुक्यात ११६३ जणांना प्रशिक्षण देऊन मास्टर ट्रेनर तयार केले. त्यात सर्व माध्यमिक खासगी, जि.प. व आश्रमशाळांमधील महिला शिक्षकांचा प्रशिक्षित करण्यात आले. त्यांच्यासोबत काही उमेदचे कर्मारी व आरोग्य कर्मचारीही प्रशिक्षित झाले. यानुसार ५० मुलींमागे एक मास्टर ट्रेनर तयार झाले. आता नोव्हेंबर महिन्यापासून ११ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींना विविध खेळ, संवादाच्या माध्यमातून कुरमा प्रथेसोबत मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, गैरसमजुती याबद्दल प्रबोधन केले जाईल.

मुली शिकवणार आईलासाधारणत: वयात येणाऱ्या मुलीला मासिक पाळीची माहिती आईकडून दिली जाते. त्यात आईवर ज्या परंपरांचा पगडा आहे तोच पगडा मुलीवर पडतो. मात्र ‘उडान’मधील प्रबोधनानंतर किशोरवयीन मुली काय योग्य, काय अयोग्य याबद्दल आपल्या आईला सांगून अपेक्षित तो बदल आपल्या घरात घडवून आणेल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाला आहे.सर्वेक्षणातून मिळविणार माहितीशाळकरी मुलींना आणि बचत गटांच्या महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, प्रबोधन झाल्यानंतर त्यांच्याकडून एका प्रश्नावलीच्या माध्यमातून काय बदल झाला हेसुद्धा जाणून घेतले जाईल. यासोबतच त्यांचे हिमोग्लोबिन, वजन, उंची यांचीही माहिती संकलित केली जाईल. त्यामुळे पुढील पिढीतील तरुणींचे आरोग्य अधिक सुदृढ होईल, असा विश्वास सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.जी.म्हशाखेत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Healthआरोग्य