लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीवरून जेप्रा या गावी दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्द जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्यासमोर घडली.मोतीराम लक्ष्मण मेश्राम (६५) रा. कापसी ता. सावली (जि. चंद्रपूर) असे मृतक इसमाचे नाव आहे. मेश्राम हे आपल्या एमएच ३४ बीई ३४२७ क्रमांकाच्या दुचाकीने कापसीवरून गडचिरोलीला आले. येथून जेप्राकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान एमएच ३३ एस १९१४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला समोरून धडक दिली. यात मेश्राम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती कळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतक इसमाच्या मृतदेहाचे शवपरिक्षण करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. या अपघाताची नोंद गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.खरपुंडी नाक्याजवळ रस्त्याच्या दुतर्फा वाहने व इतर सामग्री मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. दुतर्फा वाहने राहत असल्यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:18 IST
गडचिरोलीवरून जेप्रा या गावी दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्द जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्यासमोर घडली.
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देखरपुंडी नाक्यासमोरील घटना : रस्त्याच्या दुतर्फा राहते वाहनांची रांग