ट्रक अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:28 IST2017-12-21T00:27:53+5:302017-12-21T00:28:18+5:30
एमआयडीसीच्या फॅक्ट्रीमध्ये किराणा साहित्य पुरवठा करून गडचिरोली शहराकडे परत येत असताना दोन मुलींना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार .....

ट्रक अपघातात दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एमआयडीसीच्या फॅक्ट्रीमध्ये किराणा साहित्य पुरवठा करून गडचिरोली शहराकडे परत येत असताना दोन मुलींना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी मार्गावर सीआरपीएफ कॅम्पजवळ घडली. विशेष म्हणजे या अपघातादरम्यान ट्रक उलटला.
देवानंद दाणे (४०) रा. विसापूर असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. एमएच-३१-एपी-४०३७ क्रमांकाचा ट्रक शहराकडे येत असताना देवानंद दाणे यांच्या एमएच-३३-यू-४६८९ क्रमांकाच्या दुचाकीला धडक बसली. यात देवानंद दाणे हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेतांना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.